गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ६१ :
बेकायदेशीर औषधी द्रव्ये किंवा पदार्थ लपविण्यासाठी वापरलेली माल सरकारजमा करणे :
या अधिनियमाखाली सरकारजमा करण्यास पात्र असलेली कोणतीही १.(गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ किंवा नियंत्रीत पदार्थ) लपविण्यासाठी वापरण्यात आलेला कोणताही मालसुद्धा सरकारजमा करण्यास पात्र असेल.
स्पष्टीकरण :
या कलमात माल या शब्दामध्ये परिवहनाचे साधन असलेल्या वाहनाचा समावेश होत नाही.
——–
१. २००१ चा अधिनियम क्रमाकं ९ याच्या कलम २७ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
