Ndps act कलम ४७ : बेकायदेशीर लागवडीबाबत माहिती पुरविणे हे विशिष्ट अधिकाऱ्यांचे कर्तव्य :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ४७ :
बेकायदेशीर लागवडीबाबत माहिती पुरविणे हे विशिष्ट अधिकाऱ्यांचे कर्तव्य :
एखाद्या जमिनीवर अफूची झाडे, कॅनॅबिस वनस्पती किंवा कोका वनस्पती यांची बेकायदेशीर लागवड करण्यात आली असल्याचे जेव्हा माहीत होईल, तेव्हा तत्काळ ती माहिती कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला किंवा कलम ४२ मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याला पुरविणे हे प्रत्येक सरकारी अधिकारी, प्रत्येक पंच, सरपंच आणि इतर ग्राम अधिकारी यांचे कर्तव्य असेल आणि अशी माहिती देण्यात हयगय करणारा प्रत्येक सरकारी अधिकारी, पंच, सरपंच आणि इतर ग्राम अधिकारी हा शिक्षेस पात्र ठरेल.

Leave a Reply