Ndps act कलम ४१ : १.(अधिपत्र (वॉरंट) आणि प्राधिकारपत्र काढण्याचे अधिकार :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
प्रकरण ५ :
कार्यपद्धती :
कलम ४१ :
१.(अधिपत्र (वॉरंट) आणि प्राधिकारपत्र काढण्याचे अधिकार :
१) राज्य शासनाने याबाबतीत विशेषरीत्या अधिकार प्रदान केलेल्या एखाद्या महानगर दंडाधिकाऱ्याला, एखाद्या व्यक्तीने (सन २००१ चा सुधारणा अधिनियम क्र. ९ अन्वये सुधारणा करण्यात आली) अन्वये शिक्षायोग्य असा कोणताही गुन्हा केला आहे, असे मानण्याला कारण असल्यास, अशा कोणत्याही व्यक्तीचय अटकेसाठी किंवा ज्यांच्या बाबतीत अन्वये शिक्षायोग्य असा अपराध करण्यात आला आहे, अशी कोणतीही गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ किंवा अशा अपराधासंबंधीचा पुरावा म्हणून जे सादर करता येतील, असे कोणतेही दस्तऐवज ज्यामध्ये लपवून ठेवले आहेत, असे मानायला वाजवी कारण असेल, अशा कोणत्याही इमारतीची, वाहनाची किंवा जागेची दिवसा किंवा रात्री झडती घेण्यासाठी वॉरंट काढू शकेल.
२) केंद्र शासनाने सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे याबाबतीत अधिकार प्रदान केले असतील असा सेंट्रल एक्साइज, गुंगीकारके, कस्टम, महसुली गुप्तवार्ता या विभागाचा केंद्र शासनाच्या किंवा सीमा सुरक्षा विभागाच्या कोणत्याही इतर विभागाचा राजपत्रित दर्जाचा कोणताही अधिकारी किंवा राज्य शासनाच्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे याबाबत तीन अधिकार प्रदान करण्यात आले असतील असा महसूल, औषध नियंत्रण, उत्पादनशुल्क, पोलिस विभागाचा किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही विभागाचा असा कोणताही अधिकारी त्याच्या वैयक्तिक माहितीवरून किंवा कोणत्याही व्यक्तीने दिलेल्या आणि लेखी घेतलेल्या माहितीवरून, एखाद्या व्यक्तीने प्रकरण चार अन्वये शिक्षायोग्य असलेला एखादा अपराध केला आहे किंवा ज्याच्या बाबतीत प्रकरण चार अन्वये शिक्षायोग्य असलेला अपराध करण्यात आला आहे, अशी कोणतीही गुंगीकारक औषधी द्रव्ये किंवा मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ किंवा असा अपराध केल्याचा पुरावा म्हणून सादर करता येतील, असे कोणतेही दस्तऐवज किंवा इतर वस्तू कोणत्याही इमारतीत, वाहनात किंवा जागेत लपवून ठेवण्यात आले आहेत, असे मानण्यास त्या अधिकाऱ्याला वाजवी कारण असल्यास, तो अशा व्यक्तीला अटक करण्यासाठी किवा इमारत, वाहन किंवा जागा यांची दिवसा किंवा रात्री झडती घेण्यासाठी त्याला दुय्यम दर्जाच्या असलेल्या परंतु चपरासी, शिपाई किंवा हवालदार यांच्या दर्जापेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्याला प्राधिकृत करू शकेल किंवा तो स्वत:च एखाद्या व्यक्तीला अटक करू शकेल किंवा इमारत, वाहन किंवा जागा यांचा शोध घेऊ शकेल.
३) पोटकलम (१) खालील वॉरंट ज्याला उद्देशून काढले असेल असा अधिकारी आणि अटक करण्यास किंवा झडती घेण्यास प्राधिकृत केलेला अधिकारी किंवा पोटकलम (२) अन्वये प्राधिकृत करण्यात आलेला अधिकारी यांना कलम ४२ खाली कृती करणाऱ्या अधिकाऱ्याला असणारे सर्व अधिकार असतील.)
——–
१. २००१ चा अधिनियम क्रमांक ९ याच्या कलम १९ अन्वये मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply