गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ३३ :
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ कलम ३६० आणि अपराधी परिवीक्षा अधिनियम, १९५८ लागू असणे :
फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) याचे कलम ३६० व अपराधी परिवीक्षा अधिनियम, १९५८ (१९५८ चा २०) यामध्ये अंतर्भूत असलेले काहीही या अधिनियमाखालील अपराधी ठरविण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत ती अठरा वर्षांखालील वयाची असल्याशिवाय किंवा तिला दोषी ठरविण्यात आलेला आरोप कलम ३६ किंवा कलम २७ खालील असल्याशिवाय लागू असणार नाही.
