Ndps act कलम ३२ : शिक्षेची तरतूद करण्यात आलेली नसेल अशा अपराधांसाठी शिक्षा :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ३२ :
शिक्षेची तरतूद करण्यात आलेली नसेल अशा अपराधांसाठी शिक्षा :
जो कोणी या प्रकरणामध्ये स्वतंत्रपणे शिक्षेची तरतूद करण्यात न आलेल्या या अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीचे किंवा त्याखाली करण्यात आलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा आदेशाचे उल्लंघन करील किंवा त्याअन्वये देण्यात आलेल्या कोणत्याही अनुज्ञप्तीच्या, परवान्याच्या किंवा प्राधिकाराच्या कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करील तो सहा महिन्यापर्यंत वाढविता येईल अशा मुदतीच्या तुरूंगवासाच्या शिक्षेस किंवा दंडाच्या शिक्षेस किंवा या दोन्ही शिक्षांस पात्र ठरेल.

Leave a Reply