गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ३१अ :
पूर्वीच्या अपराधानंतरच्या विशिष्ट अपराधासाठी देहदंडाची शिक्षा :
१) कलम ३१ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, (कलम १९, २४ व २७अ आणि गुंगीकाकर औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या व्यापारी मात्रा संबंधी शिक्षा पात्र ठरेल असा कोणताही अपराध केल्याबद्दल किंवा करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल किंवा त्यासाठी अपप्रेरणा दिल्याबद्दल किंवा दंडनीय कट केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आलेली आहे अशी कोणतीही व्यक्ती नंतर पुढील गोष्टींशी संबंधित अपराध केल्याबद्दल, त्याचा प्रयत्न केल्याबद्दल किंवा त्यासाठी अपप्रेरणा दिल्याबद्दल किंवा तो करण्याचा दंडनीय कट केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आल्यास-
अ) पुढील तक्त्यामध्ये स्तंभ (१) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या गुंगीकारक औषधी द्रव्याच्या किंवा मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाच्या अशा औषधी द्रव्यापैकी किंवा पदार्थांपैकी प्रत्येकासमोर सदर तक्त्यात स्तंभ (२) मध्ये दर्शविण्यात आलेल्या प्रमाणातील किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणातील औषधी द्रव्याचे किंवा पदार्थाचे उत्पादन, निर्मिती, ताबा, परिवहन, त्याची भारतात आयात किंवा भारतातून निर्यात किंवा वाहनबदल यांमध्ये गुंतलेली असल्यास,
तक्ता :
———————————
गुंगीकारक औषधी द्रव्य / मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचा तपशील (१)एक) अफू
परिमाण (२) :१० कि.ग्रॅ.
———————————
गुंगीकारक औषधी द्रव्य / मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचा तपशील (१)दोन) मॉङ्र्कि न (अफूचा अर्क)
परिमाण (२) :१ कि.ग्रॅ.
———————————
गुंगीकारक औषधी द्रव्य / मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचा तपशील (१)तीन) हेरॉईन (अफूच्या अर्कापासून बनविलेले गुंगी आणणारे औषध)
परिमाण (२) :१ कि.ग्रॅ.
———————————
गुंगीकारक औषधी द्रव्य / मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचा तपशील (१)चार) कोडेईन (सौम्य वेदनाशामक व गुंगी आणणारे / अफूचे एक अल्कलॉइड)
परिमाण (२) :१ कि.ग्रॅ.
———————————
गुंगीकारक औषधी द्रव्य / मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचा तपशील (१)पाच) थेबाईन (नत्रयुक्त विषारी पदार्थ / अफूतून प्राप्त करतात)
परिमाण (२) :१ कि.ग्रॅ.
———————————
गुंगीकारक औषधी द्रव्य / मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचा तपशील (१)सहा) कोकेन (गुंगी आणणारा एक मादक पदार्थ)
परिमाण (२) :५०० ग्रॅम.
———————————
गुंगीकारक औषधी द्रव्य / मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचा तपशील (१)सात)हशिश (चरस )
परिमाण (२) :२० कि.गॅ.
———————————
गुंगीकारक औषधी द्रव्य / मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचा तपशील (१)आठ)वरील पैकी कोणत्याही औषधी द्रव्याच्या कोणत्याही उदासीन सामग्री सह किंवा त्याविना कोणतेही मिश्रण
परिमाण (२) :१५०० ग्रॅम १(वर उल्लेख केलेल्या प्रमाणात दरम्यान संबंधीत औषधे आणि अमली पदार्थ यांचे मिश्रण भाग यांपैकी कमी.)
———————————
गुंगीकारक औषधी द्रव्य / मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचा तपशील (१)नऊ) एल.एस.डी, एल.एस.डी.२५ (+)ए.एन, डायथिला सर्गमाईड (डी-लिसर्जिक अॅसिड डायथिलामाईड)
परिमाण (२) :५०० ग्रॅम.
———————————
गुंगीकारक औषधी द्रव्य / मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचा तपशील (१)दहा)टिएचसी (टेट्राहाड्रॉकॅननाविनोल्स, पुढील आयसोमेरिके ६अ(१०अ), ६अ (७), ७,८,९,१०, ९(११) व त्यांची स्टेरिऑकेमिकल वॅरिअन्ट.
परिमाण (२) :५०० ग्रॅम.
———————————
गुंगीकारक औषधी द्रव्य / मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचा तपशील (१)अकरा)मेथाम फेटामाईन (+)-२-मेथिलामाईन-१-फेन्लिप्रोपाने
परिमाण (२) :१५०० ग्रॅम
———————————
गुंगीकारक औषधी द्रव्य / मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचा तपशील (१)बारा)मेथाकलोन (२-मिथाईल-३-ओ-टोलील-४-(३-एच) क्वीनाझोनिलॉन)
परिमाण (२) :१५०० ग्रॅम
———————————
गुंगीकारक औषधी द्रव्य / मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचा तपशील (१)तेरा) अॅम्फेटामाईन (+) २-अमिनो-१-ङ्कि नाईनप्रोपान
परिमाण (२) :१५०० ग्रॅम
———————————
गुंगीकारक औषधी द्रव्य / मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांचा तपशील (१)चौदा) (नऊ ते तेरा) यामध्ये नमूद करण्यात आलेल्या मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाचे सिद्ध पदार्थ व क्षार
परिमाण (२) :१५०० ग्रॅम
———————————
ब) खंड (अ) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्यांपैकी कोणत्याही गोष्टीमध्ये प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अर्थसाहाय्य करीत असल्यास ती देहदंडास पात्र ठरेल.
२) कोणत्याही व्यक्तीला, भारताबाहेर ङ्क ौजदारी अधिकार क्षेत्र असल्यास सक्षम न्यायालयाने (कलम १९, २४ व २७ अ आणि गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाच्या व्यापारी मात्रा संबंधी शिक्षा पात्र ठरेल असा) तरतुदींशी सुसंगत अशा कोणत्याही कायद्यान्वये दोषी ठरवले असेल अशा बाबतीत अशा दोषसिद्धींच्या बाबतीत पोट कलम (१) च्या प्रयोजनासाठी त्या व्यक्तीला भारतातील न्यायालयाने दोषी ठरवले आहे, असे मानून कार्यवाही करण्यात येईल.
१.सन २००१ चा सुधारणा अधिनियम क्र. ९ च्या कलम १३ अन्वये सुधारणा करण्यात आली.
