Ndps act कलम २७अ : बेकायदेशीर व्यापाराला अर्थसाहाय्य करणे आणि अपराध्याला आश्रय देणे यासाठी शिक्षा :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम २७अ :
बेकायदेशीर व्यापाराला अर्थसाहाय्य करणे आणि अपराध्याला आश्रय देणे यासाठी शिक्षा :
जी कोणी कलम २ खंड (आठ -अ) च्या उपखंड (एक) ते (पाच) मध्ये, विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या कोणत्याही कृतीसाठी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अर्थसहाय्य देण्यात सहभागी होईल किंवा उपरोक्तपैकी कोणत्याही कृतींमध्ये गुंतलेल्या कोणत्याही व्यक्तीला आसरा देईल, तो वर्षांपेक्षा कमी नाही परंतु वीस वर्षांपर्यंत वाढविता येईल इतक्या मुदतीच्या सक्त मजुरी किंवा एक लाख रूपयांपेक्षा कमी नाही परंतु दोन लाख रूपयांपर्यंत वाढविता येईल इतक्या दंडाची शिक्षा होण्यास पात्र ठरेल.
परंतु न्यायालयास न्यायनिर्णयात कारणे नमूद करून दोन लाख रूपयांपेक्षा अधिक रकमेचा दंड आकारता येईल.

Leave a Reply