गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम २४ :
गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या बाबत कलम १२ चे उल्लंघन करून बाह्य व्यवहार करण्याबद्दल शिक्षा :
जी कोणी, केंद्र शासनाचे प्राधिकारपत्र घेतल्याशिवाय किंवा कलम १२ अन्वये देण्यात आलेल्या अशा प्राधिकारपत्रातील शर्तीनुसार (कोणत्याही असल्यास) असेल त्याव्यतिरिक्त, भारताबाहेर प्राप्त केलेल्या आणि भारताबाहेरील कोणत्याही व्यक्तीला पुरविण्यात आलेल्या गुंगीकारक औषधी द्रव्याच्या किंवा मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या कोणत्याही व्यापारात गुंतलेली असेल किंवा त्यावर नियंत्रण ठेवील ती, दहा वर्षांपेक्षा कमी नाही परंतु वीस वर्षांपर्यंत वाढविता येईल अशा सक्त मजुरीसह कैदेस शिक्षेस आणि तसेच एक लाख रूपयांपेक्षा कमी नाही; परंतु दोन लाख रूपयांपर्यंत वाढविता येईल अशा दंडास पात्र ठरेल.
परंतु, न्यायालयास न्यायनिर्णयात कारण नमूद करून दोन लाख रूपयांपेक्षा अधिक रकमेचा दंड लादता येईल.
