Ndps act कलम १८ : अफूचे झाड आणि अफू यांच्या बाबत उल्लंघनासाठी शिक्षा :

गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम १८ :
अफूचे झाड आणि अफू यांच्या बाबत उल्लंघनासाठी शिक्षा :
जी कोणी व्यक्ती या अधिनियमाच्या तरतुदीचे, त्यानुसार करण्यात आलेल्या नियमांचे किंवा आदेशांचे किंवा त्याअन्वये देण्यात आलेल्या अनुज्ञप्तीच्या शर्तीचे उल्लंघन करून अफूच्या झाडांची लागवड करील किंवा अफूचे उत्पादन, निर्मिती करील, तिचा ताबा घेईल, विक्री, खरेदी, वाहतूक करील, आंतरराज्यांत आयात-निर्यात करील किंवा वापर करील ती-
अ) अल्प मात्राच्या उल्लघंनाकरिता, १.(एक वर्षापर्यंत) सक्त मजूरीच्या कैदेस किंवा दहा हजार रूपये दंड किंवा दोन्ही शिक्षांकरिता पात्र ठरेल.
ब) व्यापारी मात्रा पेक्षा कमी परंतू अल्पमात्रा जास्त मात्राच्या उल्लंघनाकरिता दहा वर्षापर्यंतच्या सक्त मजूरीच्या कैदेस आणि एक लाख रूपये पर्यंत दंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल.
क) व्यापारी मात्राच्या उल्लंघनाकरिता, दहा वर्षापेक्षा कमी असणार नाही परंतु विस वर्षापर्यंतच्या सक्त मजुरीच्या कैदेस आणि एक लाख रूपयाहून कमी नसेल इतक्या परंतु रूपये दोन लाख पर्यंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या दंडासही पात्र ठरेल.
तथापी न्यायालयाला न्यायनिर्णयात कारण नमूद करून दंडाची रक्कम दोन लाख रूपयांपेक्षाही वाढविता येईल.
——–
१. २०१४ चा अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम ८ अन्वये सहा महीन्यापर्यंत याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply