Mv act 1988 कलम १६४ड(घ) : १.(राज्य शासनाची नियम करण्याची शक्ती :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १६४ड(घ) :
१.(राज्य शासनाची नियम करण्याची शक्ती :
१) राज्य शासन, कलम १६४क मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या बाबींव्यतिरिक्त या प्रकरणातील उपबंधाना क्रियान्वित करण्याच्या प्रयोजनासाठी नियम बनवू शकेल.
२) पूर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारणतेला हानी न पोचवता, आा नियमांमध्ये खालीलप्रमाणे उपबंध करता येतील :-
(a)क)अ) कलम १४७ च्या पोटकलम ५) अन्वये अन्य प्राधिकारी; आणि
(b)ख)ब) विहित करावयाची असेल किंवा करता येईल किंवा ज्याच्या संबंधात नियमांद्वारे उपबंध करता येण्यासारख्या इतर बाबी;
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ५१ अन्वये मूळ प्रकरण ११ ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply