मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १३५ :
अपघाताच्या प्रकरणांचे अन्वेषण करण्यासाठी आणि रस्त्याच्या कडेच्या सोयी इत्यादी पुरविण्यासाठी योजना :
१) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे,-
(a)क) अ) मोटार वाहन अपघाताची कारणे व विश्लेषण यावरील सखोल अभ्यास;
(b)ख) ब) महामार्गावर रस्त्यांलगतच्या सुखसोयी करणे;
(c)ग) क) महामार्गावरील वाहतूक सहाय्य ठाणी (चौक्या); १.(***)
(d)घ) ड) महामार्गाच्या बाजुने मालमोटारी उभ्या करण्यासाठी २.(वाहनतळ; आणि)
(e)ङ) ३.(ई) जनतेच्या हिताच्या दृष्टीने सुरक्षिततेसाठी इतर अन्य सुविधा)
यांची तरतुद करण्यासाठी एक किंवा अधिक योजना तयार करु शकेल.
२) राज्य शासनाने या कलमाखाली केलेली प्रत्येक योजना ती करण्यात आल्यानंतर होईल तितक्या लवकर राज्य विधानमंडळासमोर मांडण्यात येईल.
४.(३) केन्द्र शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, रस्त्यावरील होणाऱ्या अपघातांची कारणे आणि त्यांचा सुक्ष्म अभ्यास करण्यासाठी एक किंवा अधिक योजना बनवू शकेल.)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ४६ अन्वये वगळण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ४६ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ४६ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ४६ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
