Mv act 1988 कलम ९३ : १.(एजंट किंवा प्रचारक किंवा समुहक याने लायसन्स मिळविणे) :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ९३ :
१.(एजंट किंवा प्रचारक किंवा समुहक याने लायसन्स मिळविणे) :
१) कोणत्याही व्यक्तीने, राज्य शासनाने विहित केले असेल, अशा प्राधिकरणाकडून, आणि अशा शर्तींना अधीन असलेले लायसन प्राप्त केलेले असल्याशिवाय तिने-
एक) सार्वजनिक सेवा वाहनातून प्रवास करण्यासाठी तिकिटे विकणारा किंवा अन्यथा अशा वाहनातून प्रवास करण्यासाठी गिऱ्हाईके शोधणारा एजंट किंवा प्रचारक म्हणून; किंवा,
दोन) मालवाहू वाहनाद्वारे वाहून आणलेला माल ताब्यात घेणे, पुढे पाठविणे किंवा त्याचे वाटप करणे या व्यवसायातील एजंट म्हणून काम करता कामा नये.
२.(तीन) समूह म्हणून, :
परंतु कोणत्याही समूहास लायसन देताना राज्य शासन, केन्द्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सिद्धांताचे अनुपालक करेल :
परंतु आणखी असे की, प्रत्येक समूह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० आणि त्याद्वारे बनविलेल्या नियमांचे व विनियमांचे अनुपालन करील.)
२) पोट-कलम (१) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या शर्तीमध्ये पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबीचा समावेश होतो त्या म्हणजे-
(a)क)अ) ज्या कालावधीसाठी लायसन देता येईल किंवा त्याचे नवीकरण करता येईल तो कालावधी;
(b)ख)ब) लायसन देण्यासाठी किंवा त्याच्या नवीकरणासाठी भरावयाची फी;
(c)ग) क) एक) मालवाहू वाहनाने वाहून आणलेला माल ताब्यात घेणे, तो पुढे पाठविणे किंवा त्याचे वाटप करणे या व्यवसायातील अभिकत्र्याच्या बाबतीत पन्नास हजार रूपयांपेक्षा अधिक नाही अशी रक्कम;
दोन) इतर कोणत्याही एजन्टाच्या किंवा प्रचारकाच्या बाबतीत पाच हजार रूपयांपेक्षा अधिक नाही अशी रक्कम प्रतिभूती म्हणून घेणे आणि अशी प्रतिभूतीची रक्कम ज्या परिस्थितीमध्ये जप्त करता येईल ती परिस्थिती;
(d)घ)ड) मार्गस्थ मालाच्या विम्याची तरतूद अभिकत्र्याने करणे;
(e)ड)ई) लायसन ज्या प्राधिकरणाला आणि ज्या परिस्थितीत निलंबित किंवा रद्द करता येईल तो प्राधिकरण व ती परिस्थिती;
(f)च)फ) राज्य शासनाकडून विहित करण्यात येतील अशा इतर शर्ती.
३) प्रत्येक लायसनची अशी अट असेल की, ज्याला लायसन देण्यात आले असेल अशा कोणत्याही अभिकत्र्याने किंवा प्रचारकाने कोणतेही वर्तामानपत्र, पुस्तक, सूची, वर्गीकृत निर्देशिका किंवा अन्य प्रकाशने यामध्ये येणाऱ्या जाहिरातीमध्ये लायसन क्रमांक, लायसन समाप्त होण्याचा दिनांक आणि लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचे तपशील दिल्याखेरीज अशा वर्तमानपत्रात, पुस्तकात, सूचीत, वर्गीकृत निर्देशिकेमध्ये किंवा अन्य प्रकाशनामध्ये कोणतीही जाहीरात देता कामा नये.
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ३६ अन्वये मूळ शिर्षकाऐवजी समाविष्ट करण्यात येईल.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ३६ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply