मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ८ :
शिकाऊ व्यक्तीचे लायसन देणे :
१) कलम ४ अन्वये मोटार वाहन चालविण्यात अपात्र ठरविऱ्यात आलेले नाही आणि जी त्या वेळी चालकाचे लायसन धारण करण्यास किंवा मिळविण्यास अपात्र नसेल अशा कोणत्याही व्यक्तीला, कलम ७ च्या तरतुदींना अधीन राहून –
एक) जेथे ती सर्वसाधारणपणे राहते किंवा व्यवसाय करते; किंवा
दोन) जेथे कलम १२ मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेली, ज्यामधून मोटार वाहन चालनाचे शिक्षण घेण्याचा तिचा उद्देश असेल अशा शाळा किंवा आस्थापना असेल;
१.(राज्यामध्ये कोणत्याही लायसन प्रधिकाऱ्यास आवेदन (अर्ज) करु शकेल ).
२) पोट-कलम (१) खालील असा प्रत्येक अर्ज, केंद्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा नमुन्यात असावा, त्याच्यासोबत असे दस्तऐवज असावे २.(, अश्या फी सोबत आणि अश्या पद्धतीत ज्याअतर्गत इलैक्ट्रॉनिक साधन आहे.)
३) पोट-कलम (१) खालील ३.(परिवहन वाहन चालविण्यासाठी प्रत्येक अर्जासोबत) केंद्र शासनाने विहित केला असेल अशा नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र असेल आणि त्यावर राज्य शासनाने किंवा राज्य शासन याबाबतीत प्राधिकृत करील अशा कोणत्याही व्यक्तीने या प्रयोजनासाठी शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नेमणूक केली असेल अशा वैद्यकीय व्यवसायाची सही असेल :
४.(***)
४) अर्जावरून किंवा पोट-कलम (३) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रावरून असे आढळून येईल की, त्याने अर्ज केलेल्या शिकाऊ व्यक्तीच्या लायसनमुळे त्याला ज्या वर्गाचे वाहन चालविण्याचे अधिकार प्राप्त होतील ते वाहन चालविण्यामुळे जनतेला किंवा प्रवाशांना धोका निर्माण होईल अशा प्रकारचा आजार त्याला झाला आहे किंवा अशा प्रकारचा दोष त्याच्यामध्ये आहे, तर लायसन देणाऱ्या प्राधिकरणाने शिकाऊ व्यक्तीचे लायसन देण्यास नकार दिला पाहिजे.
परंतु तो ५.(रुपांतरित वाहन (अॅडप्टेड वाहन ) चालविण्यास सक्षम आहे अशी लायसन देणाऱ्या प्राधिकरणाची खात्री झाल्यास ते ५.(रुपांतरित वाहन (अॅडप्टेड वाहन ) चालविण्यापुरते मर्यादित असलेले शिकाऊ व्यक्तीचे लायसन अर्जदारास देऊ शकेल.
५) केंद्र शासनाकडून विहित करण्यात आली असेल, ६.(अशा अटींची (नियम) पूर्तता करीत नाही तोपर्यंत) कोणत्याही अर्जदाराला शिकाऊ व्यक्तीचे लायसन देण्यात येणार नाही.
६) समुचित लायसन देणाऱ्या प्राधिकरणाकडे रीतसर अर्ज करण्यात आला असेल आणि अर्जदाराने पोट-कलम (३) अन्वये आपल्या शारीरिक पात्रतेसंबंधी अशा प्राधिकरणाचे समाधान करण्यात आले असेल आणि पोट-कलम (५) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेली चाचणी लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचे समाधान होईल अशा रीतीने पूर्ण करण्यात आली असल्यास लायसन देणारे प्राधिकरण कलम ७ च्या तरतुदींना अधीन राहून अर्जदाराला शिकाऊ व्यक्तीसाठी असलेले लायसन देईल. परंतु, अर्जदार कलम ४ नुसार मोटार वाहन चालविण्यास अपात्र ठरलेला नसला पाहिजे किंवा त्या वेळी मोटार वाहन चालकाचे लायसन धारण करण्यास किंवा प्राप्त करण्यास तिला अपात्र ठरविण्यात आलेले नसले पाहिजे :
परंतु, अर्जदार समुचित लायसन देणाऱ्या प्राधिकरणाकडे अर्ज करण्यास असमर्थ असण्यासाठी योग्य असे कारण आहे याबाबत लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचे समाधान झालेले असल्यास ते प्राधिकरण समुचित प्राधिकरण नसले तरीही मोटार सायकल किंवा हलक्या वजनाचे मोटार वाहन चालविण्याचे शिकाऊ व्यक्तीचे लायसन देऊ शकेल :
७.( परंतु आणखी असे की, लायसन प्राधिकारी शिकाऊ लायसन इलेक्ट्रानिकी पद्धतीत असेल व अशा पद्धतीत असेल जसे केंद्र सरकार विहित करील :
परंतु आणखी असे की, लायसन जारी (मान्य) करण्यापूर्वी केंद्र सरकार विहित केलेल्या पद्धतीने अर्जदाराची ओळख सत्यनिष्ठ करुन घेईल.)
७) व्यक्तींच्या कोणत्याही वर्गाला पोट-कलम (३), किंवा पोट-कलम (५) च्या तरतुदी किंवा या दोन्हीच्या तरतुदींमधून सूट देणे आवश्यक किंवा इष्ट आहे याबाबत केंद्र शासनाचे समाधान झाले असेल अशा बाबतीत, ते शासन या बाबतीत नियम करून, एकतर पूर्णपणे किंवा या नियमांमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आल्या असतील अशा शर्तींना अधीन राहून, सर्वसाधारणपणे सूट देऊ शकेल.
८) मोटार सायकल चालविण्याचे कोणतेही शिकाऊ व्यक्तीचे लायसन, जे या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी अमलात असेल, ते गियर असलेल्या किंवा नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मोटार सायकली चालविण्यासाठी अशा प्रारंभाच्या नंतरही प्रभावी असल्याचे मानण्यात येईल.
———-
१. २०१९ चा ३२ कलम ४ द्वारा बदली समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा ३२ कलम ४ द्वारा बदली समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा ३२ कलम ४ द्वारा बदली समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा ३२ कलम ४ द्वारा वगळण्यात आले.
५. २०१९ चा ३२ कलम ४ द्वारा बदली समाविष्ट करण्यात आले.
६. २०१९ चा ३२ कलम ४ द्वारा बदली समाविष्ट करण्यात आले.
७. २०१९ चा ३२ कलम ४ द्वारा समाविष्ट करण्यात आले.