मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ८८अ(८८क) :
१.(राष्ट्रीय, मल्टीमॉडेल (वहुविध) आणि आंतरराज्य प्रवासी आणि माल वाहतूक याबाबत योजना (स्कीम) तयार करण्याची केन्द्र शासनाची शक्ती (अधिकारिता) :
या अधिनियमात काहीही असले तरी, केन्द्र शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमान्वये दिलेल्या कोणत्याही परिमिटमध्ये (परवान्यामध्ये) बदल करु शकेल किंवा राष्ट्रीय, मल्टीमॉडेल आणि आंतरराज्य प्रवासी आणि माल वाहतूक याबाबत योजना बनवू शकेल आणि निम्नलिखित प्रयोजनासाठी अशा योजनेअंतर्गत लायसन देऊ शकेल किंवा बदलू शकेल, अर्थात:-
(a)क)अ) शेवटचा टप्पा सांधणे;
(b)ख)ब) ग्रामीण वाहतूक;
(c)ग) क) माल आणि पुरवठा करण्याबाबत गतीमध्ये सुधारणा करणे;
(d)घ) ड) वाहतुकीचे सामथ्र्य वाढविण्यास सुधारणा करणे;
(e)ङ)ई) विशेषत: स्पर्धात्मकता, उत्पादकता आणि कार्यक्षमता सक्षम करुन शेत्रातील आर्थिक सामथ्र्य यांची वाढ करणे;
(f)च) फ) जनतेचा वावर आणि सुलभतेत, गतिशीलतेत वाढ;
(g)छ)ग) पर्यावरणाचे संरक्षण आणि सर्वर्धन;
(h)ज) ह) उर्जा संर्वर्धनाला प्रोत्साहन;
(i)झ) आय) आयुष्याच्या दर्जा सुधारणे;
(j)ञ)जे) वाहतूक पद्धत आणि वाहतूक प्रणाली यांचे एकीकरण आणि जोडणी यांची वाढ; आणि
(k)ट) के) केन्द्र शासनाला योग्य वाटतील असे अन्य विषय किंवा बाबी :
परंतु केन्द्र शासन या पोटकलमा अतर्गत कारवाई करण्यापूर्वी राज्य शासनाबरोबर विचारविनिमय करेल.
२) पोटकलम (१) मध्ये काहीही असले तरी, दोन किंवा अधिक रज्यामध्ये माल किंवा प्रवाशांच्या आंतरराज्य वाहतुकीसाठी योजना बनवू शकेल :
परंतु केन्द्र शासनाने पोटकलम (१) अन्वये बनविलेली योजना आणि दोन किंवा अधिक राज्यामध्ये या पोटलमान्वये बनविलेली योजना यांमध्ये भिन्नता असेल तर पोटकलम (१) अन्वये बनविलेल्या योजनेला प्राधान्य असेल.)
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ३४ अन्वये समाविष्ट करण्यात आले.