मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ८६ :
परवाने रद्द करणे व स्थगित ठेवणे :
ज्याने परवाना दिलेला असेल त्या परिवहन प्राधिकरणाला पुढील बाबतीत परवाना रद्द करता येईल किंवा त्यास आवश्यक वाटेल अशा कालावधीसाठी तो स्थगित ठेवता येईल-
(a)क)अ) कलम ८४ मध्ये नमुद केलेल्या कोणत्याही शर्तीचा किंवा परवान्यामध्ये असलेल्या कोणत्याही शर्तींचा भंग करण्यात येईल तेव्हा; किंवा
(b)ख)ब) परवानाधारक, परवान्याद्वारे प्राधिकार मिळालेल्या नसेल, अशा कोणत्याही रीतीने वाहनाचा वापर करील किंवा वापर करवील किंवा वापर करू देईल तर; किंवा
(c)ग) क) परवान्याशी संबंधित असणाऱ्या वाहनावर परवानाधारकाची मालकी असण्याचे बंद होईल तर, किंवा
(d)घ) ड) परवानाधारकाने लबाडीने किंवा चुकीची माहिती देऊन परवाना मिळविलेला असेल, किंवा
(e)ड) ई) मालमोटार परवानाधारकाने, परवाना ज्या प्रयोजनासाठी दिलेला होता त्या प्रयोजनासाठी ते वाहन वापरण्यात रास्त कारणाशिवाय कसूर केलेली असेल, तर किंवा
(f)च) फ) परवानाधारकाने कोणत्याही विदेशाचे नागरिकत्त्व मिळवलेले असेल तर :
परंतु, परवानाधारकाला खुलासा करण्याची संधी दिल्याशिवाय कोणताही परवाना स्थगित किंवा रद्द करण्यात येणार नाही.
२) कलम ६८ च्या पोट-कलम (५) खाली यासंबंधात ज्याला अधिकार दिलेले आहेत अशा कोणत्याही प्राधिकरणाने किंवा व्यक्तीने दिलेला परवाना हा जणू काही परिवहन प्राधिकरणाने दिलेला परवाना असावा, अशा प्रकारे परिवहन प्राधिकरण, त्याला पोट-कलम (१) खाली मिळालेले अधिकार सदर परवान्याच्या संबंधात वापरू शकेल.
३) परिवहन प्राधिकरण एखादा परवाना रद्द किंवा स्थगित करील तेव्हा ते त्याने केलेल्या कारवाईची कारणे परवानाधारकाला लेखी कळवील.
४) ज्याने परवाना दिला त्या परिवहन प्राधिकरणाला पोट-कलम (१) खाली वापरता येण्याजोगे (परवाना रद्द करण्याच्या अधिकाराव्यतिरिक्त अन्य) अधिकार कलम ६८ च्या पोट-कलम (५) खाली ज्या कोणत्याही प्राधिकरणाला किंवा व्यक्तीला देण्यात आलेले असतील, त्या प्राधिकरणाला किंवा व्यक्तीला असे धिकार वापरता येतील.
५) एखादा परवाना पोट-कलम (१) चा खंड (अ) किंवा खंड (ब) किंवा खंड (ई) खाली रद्द केला जाण्यास किंवा स्थगित केला जाण्यास लायक असेल आणि परवानाधारकाने विवक्षित रक्कम भरण्याचे मान्य केले तर प्रकरणाची परिस्थिती विचारात घेता परवाना अशा प्रकारे रद्द किंवा स्थगित करणे आवश्यक किंवा इष्ट ठरणार नाही असे परिवहन प्राधिकरणाचे मत असेल तर त्या बाबतीत पोट-कलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी परिवहन प्राधिकरणाला तो परवाना प्रकरणपरत्वे रद्द किंवा स्थगित करण्याऐवजी त्या परवान्याच्या धारकाने कबूल केलेली रक्कम त्या धारकाकडून वसूल करता येईल.
६) परिवहन प्राधिकरणाला पोट-कलम (५) खाली वापरता येत असतील असे अधिकार, कलम ८९ खाली अपील दाखल करण्यात आलेले असेल, त्या बाबतीत अपील प्राधिकरणालादेखील वापरता येतील.
७) कलम ८८ च्या पोट-कलम (९) मध्ये उल्लेख केलेल्या परवान्याच्या संबंधात परवाना देणाऱ्या परिवहन प्राधिकरणाला (परवाना रद्द करण्याच्या अधिकाऱ्याखेरीज अन्य असे) पोट-कलम (१) खाली वापरण्याजोगे जे अधिकार असतील, ते अधिकार कोणत्याही परिवहन प्राधिकरणाला वापरत येतील आणि कलम ६८ च्या पोट-कलम (५) खाली या संबंधात अधिकार बहाल करण्यात आलेला असेल, अशा कोणत्याही प्रादिकरणाला किंवा व्यक्तींना अशा प्रकारे वापरता येईल, की जणू काही सदर परवाना अशा कोणत्याही प्राधिकरणाने किंवा व्यक्तींनी दिलेला परवानाच होता.