Mv act 1988 कलम ७९ : मालमोटार परवाना देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ७९ :
मालमोटार परवाना देणे :
१) प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कलम ७७ अन्वये त्याच्याकडे अर्ज करण्यात आल्यांनतर संपूर्ण राज्यभर कायदेशीर असेल असा किंवा अर्जानुसार किंवा त्यास योग्य वाटेल अशा फेरफारांसह मालमोटार परवाना देऊ शकेल किंवा असा परवाना देण्याचे नाकारू शकेल :
परंतु, अर्जात विनिर्दिष्ट न केलेल्या कोणत्याही क्षेत्रात किंवा मार्गाच्या संबंधात असा परवाना देण्यात येणार नाही.
२) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मालमोटार परवाना देण्याचे ठरविल्यास ते या अधिनियमाखाली करण्यात येतील, अशा कोणत्याही नियमांच्या अधीन राहून, त्या परवान्याला पुढीलपैकी कोणतीही एक किवा अधिक शर्ती जोडू शकेल; त्या शर्ती अशा-
एक) त्या वाहनाचा उपयोग पक्त विनिर्दिष्ट क्षेत्रात किंवा विनिर्दिष्ट मार्गावर किंवा मार्गांवर करावा लागेल;
दोन) उपयोगात आणल्या जाणाऱ्या कोणत्याही वाहनाचे ठोकळ वजन विनिर्दिष्ट कमाल वजनापेक्षा अधिक होता कामा नये;
तीन) विनिर्दिष्ट स्वरूपाच्या मालाची ने-आण करता येणार नाही;
चार) मालाची ने-आण विनिर्दिष्ट दरांनुसार करावी लागेल;
पाच) वाहन ठेवणे, त्याची देखभाल व दुरूस्ती यासाठी आणि वाहून न्यावयाच्या मालाची साठवण व सुरक्षित सांभाळ यासाठी विनिर्दिष्ट व्यवस्था करावी लागेल;
सहा) राज्य शासन वेळोवेळी ठरवून देईल अशी नियतकालिक विवरणे आकडेवारी आणि इतर माहिती परवानाधारकाने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला द्यावी लागेल.
सात) किमान एक महिन्याची नोटीस देऊन नंतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरराला;
(a)क)अ) परवान्याच्या शर्तींमध्ये फेरफार करता येतील;
(b)ख)ब) परवान्याला आणखी शर्ती जोडता येतील.
आठ) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मान्यता असेल, त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत परवान्याच्या शर्तींना सोडून कोणतीही गोष्ट करता येणार नाही;
नऊ) घालून देण्यात येतील अशा इतर कोणत्याही शर्ती.
३) पोट-कलम (२) मध्ये उल्लेख केलेल्या शर्तींमध्ये, मानवी जीविताच्या दृष्टीने धाकादायक किंवा जोखमीच्या स्वरूपाच्या मालावर वेष्टन घालणे व त्याची ने-आण करणे यासंबंधीच्या शर्तींचा समावेश करता येईल.

Leave a Reply