मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ७३ :
करारावरील गाडीच्या परवान्यासाठी अर्ज :
करारावरील गाडीच्या संबंधातील परवान्यासाठी (या प्रकरणात याचा उल्लेख करारावरील गाडीचा परवाना असा केला आहे) करावयाच्या अर्जामध्ये पुढील तपशील समाविष्ट असेल-
(a)क)अ) वाहनाचा प्रकार व आसनक्षमता;
(b)ख)ब) ज्या क्षेत्रासाठी परवाना हवा असेल ते क्षेत्र;
(c)ग) क) ठरवून देण्यात येईल असा इतर कोणताही तपशील.