Mv act 1988 कलम ७२ : टप्पा वाहन परवाने देणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ७२ :
टप्पा वाहन परवाने देणे :
१) कलम ७१ च्या तरतुदींना अधीन राहून, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, कलम ७० खाली त्याच्याकडे अर्ज करण्यात आल्यांनतर या अर्जानुसार किंवा त्यात त्याला आवश्यक वाटतील असे फेरफार करून टप्पा वाहनाचा परवाना देऊ शकेल किंवा असा परवाना देण्याचे नाकारू शकेल;
परंतु, त्या अर्जामध्ये नमूद न केलेल्या अशा कोणत्याही मार्गाच्या किंवा क्षेत्राच्या संबंधात असा परवाना देता कामा नये.
२) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने टप्पा वाहनाचे परवाना देण्याचे ठरविले तर ते एका ठराविक वर्णनाच्या टप्पा वाहनासाठी परवाना देऊ शकेल आणि या अधिनियमाखाली करण्यात येतील. अशा कोणत्याही नियमांच्या अधीन राहून त्या परवान्याला पुढीलपैकी एक किंवा अधिक शर्ती लागू करू शकेल. त्या शर्ती अशा-
एक) केवळ विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्रात किंवा विनिर्दिष्ट केलेल्या मार्गांवर किंवा मार्गावर वाहनाचा उपयोग करावा लागेल;
दोन) टप्पा वाहनाचे कार्य विनिर्दिष्ट केलेल्या तारखेपासून सुरू होईल;
तीन) सर्व साधारणपणे किंवा विनिर्दिष्ट दिवशी आणि प्रसंगी, कोणत्याही मार्गाच्या किंवा क्षेत्राच्या संबंधात दर दिवशी करावयाच्या फेऱ्यांची कमीत कमी आणि जास्तीत जास्त संख्या;
चार) टप्पा वाहनाच्या ज्या वेळापत्रकाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिलेली असेल, त्याच्या प्रती वाहनांवर आणि त्या मार्गांवरील किंवा त्या क्षेत्रामधील विनिर्दिष्ट वाहनतळांवर आणि थांब्यांवर लावाव्या लागतील;
पाच) मान्यताप्राप्त वेळापत्रकाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिलेली असेल, त्याच्या प्रती वाहनांनवर आणि थांब्यांवर लावाव्या लागतील.;
सहा) नगरपालिकेच्या सीमांमध्ये आणि ठरवून देण्यात येईल, अशा इतर क्षेत्रांमध्ये व ठिकाणी, विनिर्दिष्ट जागांव्यतिरिक्त अन्यत्र उतारूंची किंवा मालाची चढउतार करता येणार नाही;
सात) टप्पा वाहनामधून सर्वसाधारणपणे किंवा किंवा विनिर्दिष्ट प्रसंगी किंवा विनिर्दिष्ट वेळी आणि क्षेत्रांमध्ये व ठिकाणी, विनिर्दिष्ट जागांव्यतिरिक्त अन्यत्र उतारूंची संख्या आणि इतक्या जास्तीत जास्त सामानाचे वजन;
आठ) उतारूंचे जे सामान विनामूल्य वाहून नेण्यात येईल त्या सामानाचे वजन व स्वरूप, प्रत्येक उतारूगंणित वाहून नेता येईल; अशा सामानचे एकूण वजन आणि उतारूंची गैरसोय न करता सामान वाहून नेण्यासाठी करावी लागेत ती व्यवस्था
नऊ) उतारूंचे जितके सामान नेण्याचे सवलत असेल त्यापेक्षा अधिक असणाऱ्या सामानावर जो खर्च आकारता येईल त्याचा दर;
दहा) मान्य तपशीलवारीनुसरूप असलेला सांगाडा (बॉडी) जोडलेल्या विनिर्दिष्ट प्रकारच्या वाहनांचा वापर करावा लागेल;
परंतु, परवान्याला ही शर्त जोडल्यामुळे मान्य तपशीलवारी प्रसिद्ध करण्यात आल्याच्या तारखेला चालविण्यात येत असलेल्या कोणत्याही वाहनाचा उपयोग त्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीपर्यंत चालू ठेवण्यात आडकाठी येणार नाही;
अकरा) वाहनामध्ये आराम व स्वच्छता यांचा दर्जा विनिर्दिष्ट दर्जानुरूप ठेवावा लागेल;
बारा) उतारूंच्या बरोबरच किंवा उतारू न नेता टप्पा वाहनामधून ज्या शर्तींवर माल वाहून नेता येईल त्या शर्ती;
तेरा) मान्य प्रवास भाडेपत्रिकेनुसार प्रवास भाडे आकारावे लागेल;
चौदा) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या प्रवास भाडे पत्रिकेची प्रत किंवा त्यातील उतारा व विशिष्ट प्रसंगांसाठी अशा रीतीने मान्यता दिलेल्या कोणत्याही विशेष प्रवासभाड्याच्या किंवा भाडेदरांचा तपशील टप्पा वाहनावर तळांवर आणि थांब्यांवर प्रदर्शित करावा लागेल;
पंधरा) विनिर्दिष्ट तपशील लिहिलेली तिकेटे उतारूंना द्यावी लागतील आणि त्या तिकिटांवर प्रत्यक्षात आकारलेले प्रवास भाडे दर्शवावे लागेल व (उतारूंना) देण्यात आलेल्या तिकिटांची नोंद विनिर्दिष्ट रीतीने ठेवावी लागेल;
सोळा) वाहनामधून, विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तींवर टपाल वाहून न्यावे लागेल. ज्या वेळात टपाल वाहून न्यायचे ती वेळ आणि आकारता येईल तो खर्च यासंबंधीच्या शर्तींचा वरील शर्तींमध्ये समावेश असेल;
सतरा) वाहतूक सेवा चालती ठेवण्यासाठी आणि विशेष प्रसंगांसाठी परवानाधारकाने राखीव म्हणून ठेवायची वाहने;
अठरा) ज्या शर्तींवर वाहनाचा करारावरील गाडी म्हणून उपयोग करता येईल त्या शर्ती;
एकोणीस) वाहन ठेवण्याची सोय, त्याची देखभाल व दुरूस्ती यांसाठी विनिर्दिष्ट व्यवस्था करावी लागेल;
वीस) राज्य शासनाकडून किंवा स्थानिक प्राधिकरणाकडून चालविण्यात येणाऱ्या कोणत्याही विनिर्दिष्ट बस-स्थानकाचा किंवा निवाऱ्याचा वापर करावा लागेल आणि अशा वापराबद्दल कोणतेही विनिर्दिष्ट भाडे किंवा शुल्क भरावे लागेल;
एकवीस) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मान्यता असेल त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत परवान्याच्या शर्तींना सोडून कोणतीही गोष्ट करता येणार नाही;
बावीस) किमान एक महिन्यांची नोटीस देऊन नंतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला-
(a)क) अ) परवान्याच्या शर्तीमध्ये फेरफार करता येतील;
(b)ख) ब) परवान्याला आणखी शर्ती जोडता येतील;
परंतु, खंड (एक) ला अनुसरून विनिर्दिष्ट केलेल्या शर्तींमध्ये अशा प्रकारे फेरफार करता येणार नाहीत की, ज्यायोगे मूळ मार्गाच्या अंतरात २४ किलोमीटरहून अधिक अंतराचा बदल होईल आणि अशा मर्यादेतील कोणत्याही फेरफारामुळे जनतेची सोय होईल आणि याप्रमाणे फेरफार केलेल्या अशा मूळ मार्गाच्या किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संबंधात स्वतंत्र परवाना देणे समयोचित नाही अशी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची खात्री झाल्यानंतरच असा फेरफार करण्यात येईल;
तेवीस) राज्य शासन वेळोवेळी ठरवून देईल अशी नियतकालिक विवरणे, आकडेवारी आणि इतर माहिती परवाना-धारकाने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला द्यावी लागेल;
चोवीस) घालून देण्यात येतील अशा इतर कोणत्याही शर्ती :
१.(परंतु प्रादेशिक परिवहन प्राधिकारी ग्रामीण भागातील टप्पा वाहनांच्या गाडीच्या परमिटच्या,काही अटी काढून टाकू शकेल.)
——-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ३२ अन्वये परंतुक समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply