Mv act 1988 कलम ६९ : परवान्यांसाठी करावयाच्या अर्जाच्या संबंधातील सर्वसाधारण तरतुदी :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ६९ :
परवान्यांसाठी करावयाच्या अर्जाच्या संबंधातील सर्वसाधारण तरतुदी :
१) परवान्यासाठी करावयाचा प्रत्येक अर्ज, ते वाहन किंवा ती वाहने यांचा जेथे वापर करावयाचे ठरवले असेल, अशा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे करण्यात येईल.
परंतु, वाहनाचा किंवा वाहनांचा त्याच राज्यांतर्गत येणाऱ्या दोन किंवा अधिक प्रदेशांमध्ये वापर करावयाचे ठरवले असल्यास, प्रस्तावित मार्ग किंवा क्षेत्र यांचा प्रत्येक प्रदेशातील भाग जवळजवळ सारखाच असेल अशा बाबतीत, वाहन किंवा वाहने ज्या प्रदेशांत ठेवावयाचे योजिले असेल, त्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात येईल.
परंतु आणखी असे की, वाहन किंवा वाहने यांचा विभिन्न राज्यातील दोन किंवा अधिक प्रदेशांमध्ये वापर करण्याचे योजले असेल, अशा बाबतीत अर्जदाराचे निवासस्थान असलेले किंवा त्याच्या व्यवसायाचे मुख्य स्थान असलेल्या प्रदेशाच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात येईल.
२) पोटकलम (१) मध्ये काहही अंतर्भूत असले तरीही, राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असा निदेश देऊ शकते की, वाहनाचा किंवा वाहनांचा विभिन्न राज्यामध्ये येणाऱ्या दोन किंवा अधिक क्षेत्रांमध्ये वापर करावयाचा ठरवले असेल, अशा बाबतीत त्या पोटकलमाखालील अर्ज, जेथे अर्जदाराचे निवासस्थान आहे किंवा त्यांची व्यवसायाची मुख्य जागा आहे अशा प्रदेशाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाकडे करण्यात येईल.

Leave a Reply