मोटार वाहन अधिनियम १९८८
प्रकरण ५ :
परिवहन वाहनांचे नियंत्रण :
कलम ६६ :
परवान्यांची आवश्यकता :
१) कोणताही मोटार मालक कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ते वाहन ज्या रीतीने उपयोगात आणले जात असेल त्या रीतीने ते त्या ठिकाणी उपयोगात आणण्यास प्राधिकृत करणारा प्रादेशिक किंवा राज्य परिवहन प्राधिकरणाने किंवा अन्य विहित प्राधिकरणाने मंजूर केलेला किंवा प्रतिस्वाक्षरित केलेला जो परवाना असेल त्याच्या शर्तीचे अनुसरण न करता अन्यथा ज्या ठिकाणी त्याचा उपयोग करु शकणार नाही किंवा उपयोग करु शकणार नाही किंवा उपयोग करण्यास परवानगी देऊ शकणार नाही. मग अशा वाहनातून उतारुंची किंवा मालाची प्रत्यक्षपणे वाहतूक केला जात असो वा नसो :
परंतु, टप्पेगाडीच्या परवान्याद्वारे वाहनांना कंत्राटी गाडी म्हणून उपयोग करण्यास, परवान्यात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा कोणत्याही शर्तीच्या अधीनतेने, प्राधिकृत केले जाईल :
परंतु आणखी असे की, टप्पेगाडीच्या परवान्याद्वारे वाहनाचा मग ते उतारु वाहून नेणारे असो वा नसो. दोन्ही बाबतीत माल वाहन म्हणून उपयोग करण्यास परवान्यात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा कोणत्याही शर्तीच्या अधीनतेने, प्राधिकृत केले जाईल :
परंतु आणखी असे की, माल वाहन परवान्याद्वारे धारकास त्याने चालवलेला उदीम (व्यापार) किंवा धंदा यासाठी किंवा त्याच्या संबंधात माल वाहन नेण्यासाठी त्या वाहनाचा उपयोग करण्यास, परवान्यात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा शर्तीच्या अधीनतेने, प्राधिकृत केले जाईल :
१.(परंतु आणखी असे की, या अधिनियमाखाली माल वाहनाला परवाना सोबत लायसन ही दिले असेल, अशा वाहनाचा उपयोग वाहन मालकाच्या विवेकाधिकाराने परवाना किंवा परवानांच्या किंवा लायसन च्या अधीन केला जाईल.)
२) माल वाहन परवानाधारकाला, विहित करण्यात येतील अशा शर्तीच्या अधीनतेने, त्या वाहनाचा उपयोग, त्याच्या मालकीचे नसलेले असे कोणतेही लोकवाहन किंवा अर्ध अनुवाहन (सेमी ट्रेलर) ओढून नेण्यासाठी करता येईल.
२.(परंतु, कोणत्याही सांधीव वाहनाच्या (आर्टीकल्टेड वाहन) परवानाधारकाला, कोणत्याही अर्थ अनुवाहनासाठी (सेमी ट्रेलर) सांधीव वाहनाच्या मूळ गतीदायकाचा उपयोग करता येईल.)
३) पोटकलम (१) चे उपबंध खालील बाबतीत लागू होणार नाहीत :-
(a)क)अ) केन्द्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या मालकीचे व कोणत्याही वाणिज्यिक उपक्रमाशी संबंधित नसलेल्या सरकारी कामासाठी उपयोगात आणले जाणारे कोणतेही परिवहन वाहन;
(b)ख)ब) स्थानिक प्राधिकरणाच्या मालकीचे किंवा स्थानिक प्राधिकरणाबरोबर केलेल्या संविदेअन्वये काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या मालकाचे व केवळ रस्तासफाई, रस्त्यावर पाणी मारणे किंवा मैलाससफाई या प्रयोजनासाठी उपयोगात आणले जाणारे कोणतेही परिवहन वाहन;
(c)ग) क) केवळ पोलीस, अग्निशामक दल किंवा रुग्णवाहिका यांच्या कामासाठी उपयोगात आणले जाणारे कोणतेही परिवहन वाहन;
(d)घ) ड) केवळ प्रेते वाहन नेण्यासाठी व त्यासोबत असणाऱ्या शोकाकूल व्यक्तींना नेण्यासाठी उपयोगात आणले जाणारे कोणतेही परिवहन वाहन;
(e)ड) ई) नादुरुस्त वाहन ओढून नेण्यासाठी किंवा नादुरस्त वाहनातील माल तेथून हलवून सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी उपयोगात आणले जाणारे कोणतेही परिवहन वाहन;
(f)च) फ) याबाबतीत राज्य शासनाकडून विहित केलेल्या अन्य कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी उपयोगात आणले जाणारे कोणतेही परिवहन वाहन;
(g)छ)ग) जी व्यक्ती मोटार वाहनाची निर्मिती करते किंवा मोटार वाहनाचा व्यापार करते किंवा न्यायधारांना (साट्यांना) जोडावयाच्या सांगाड्याची बांधणी करते अशा व्यक्तीने, केन्द्र शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे याबाबतीत विनिर्दिष्ट करील अशा प्रयाजनांसाठीच व अशा शर्तीनुसारच केवळ उपयोगात आणलेले कोणतेही परिवहन वाहन;
३.(***)
(i)झ) आय) ज्याचे भारसहित वजन ३००० किलोग्रॅमहून अधिक नाही असे कोणतेही मालवाहन;
(j)ञ)जे) केन्द्र शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील अशा शर्तीच्या अधीनतेने, एका राज्यात खरेदी केलेले व कोणताही उतारु वा माल न घेता, त्याच राज्यातील किंवा अन्य कोणत्याही राज्यातील एखाद्या ठिकाणी जाणारे कोणतेही परिवहन वाहन;
(k)ट) के) कलम ४३ खाली ज्याती तात्पुरती नोंदणी करण्यात आलेली असून वाहनाची नोंदणी करण्यासाठी कोणत्याही ठिकाणी रिकामे जात असलेले कोणतेही परिवहन वाहन;
४.( * * *)
(m)ड) एम) पूर, भूकंप किंवा अन्य कोणतीही नैसर्गिक आपत्ती, रस्त्यावरील अडथळा किंवा अकल्पित घटना यामुळे आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचण्याच्या दृष्टीने रस्ता बदलून अन्य कोणत्याही मार्गावरुन न्यावे लागते असे कोणतेही परिवहन वाहन मग ते राज्यातील असो वा राज्याबाहेरील असो;
(n)ढ) एन) केन्द्र शासन किंवा राज्य शासन आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करील अशा प्रयोजनांसाठी उपयोगात आणले जाणारे कोणतेही परिवहन वाहन;
(o)ण) ओ) भाडे-खरेदी, भाडेपट्टा किंवा तारणगहाण कराराधीन असलेले आणि मालकाच्या कसुरीमुळे (चुकीमुळे), मालकाने अशा ज्या व्यक्तीबरोबर असा करार केलेला असेल त्या व्यक्तीने किंवा तिच्या वतीने अशा मोटार वाहनाचा, ते इच्छित ठिकाणी जावे यासाठी, कब्जा घेतला असेल असे कोणतेही परिवहन वाहन; किंवा
(p)त) पी) दुसस्तीसाठी कोणत्याही ठिकाणी रिकामे जात असलेले कोणतेही परिवहन वाहन;
(q)थ)५.(क्यू) कलम ६७ च्या पोटकलम (३) किंवा कलम ८८अ च्या पोटकलम (१) च्या योजनेअंर्तगत लायसन दिलेले किंवा केन्द्र शासन किंवा राज्यसरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे चालविले जाणारे कोणतेही परिवहन वाहन;)
४) पोटकलम (३) च्या उपबंधांच्या अधीनतेने, पोटकलम (१) हे, राज्य शासनाने कलम ९६ अन्वये केलेल्या नियमाद्वारे तसे विहित केले तर, चालक सोडून नऊपेक्षा अधिक व्यक्ती वाहून नेण्यासाठी अनुकूल बदल करुन घेतलेल्या कोणत्याही मोटार वाहनास लागू होईल.
———
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २९ अन्वये परंतुक समाविष्ट करण्यात आले.
२. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम २० अन्वये मूळमजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. २००० चा अधिनियम क्रमांक २७ याच्या कलम ४ अन्वये वगळण्यात आले.
४. २००१ चा अधिनियम क्रमांक ३९ याच्या कलम २ अन्वये वगळण्यात आले.
५. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.