मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ६६अ (६६क) :
१.(राष्ट्रीय परिवहन नीति (धोरण) :
१) केन्द्र शासन राज्य शासन आणि इतर अभिकरणांशी विचारविनिमय करुन, या अधिनियमाच्या उद्देशांशी सुसंगत राष्ट्रीय परिवहन नीती (धोरण) निम्नलिखित गोष्टींना लक्षात ठेवून तयार करील किंवा विकसित करील :-
एक) प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी एक योजना आराखडा तयार करेल, ज्यामध्ये परिवहन संस्था कार्यरत आहेत;
दोन) सर्व प्रकारच्या रस्ते वाहतुकीसाठी बंदरे, रेल्वे, आणि विमान वाहतूक यासाठी राज्यस्तरीय नियोजनाशी संबंधित अधिकारी आणि एजन्सी यांच्याशी विचारविनिमय करुन संपूर्ण भारतातील वाहतूक सुधारणा, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, एकात्मिक मल्टीमॉडेल वाहतूक प्रणालीच्या वितरणासाठी जमिन धारण करणे, यासाठी एक मध्यम आणि दिर्घकालीन नियोजन आराखडा तयार करणे;
तीन) परमिट आणि योजना मान्य करण्यासाठी फ्रेमवर्क स्थापन करणे;
चार) रस्त्यावरील वाहतुकीसाठी धोरणात्मक योजना प्रस्थापित करणे आणि तिचे इतर वाहतुकीच्या साधनांना जोडणारी भूमिका तयार करणे;
पाच) वर्तमान आणि भविष्यतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देणे व त्यातील धोरणात्मक धोरणे ओळखणे;
सहा) मध्यम ते दीघकालीन धोरणात्मक दिशानिर्देश, प्राधान्यक्रम आणि कृती साठी उपबंध प्रदान करणे;
सात) प्रतिस्पर्धा, नवपरिवर्तन, सक्षमता मध्ये वृद्धी, हालचालीत सरळपणा, माल किंवा पशुधन किंवा प्रवाशांची वाहतूक याबाबत वाहतुकीत तत्परता आणि संसाधनांचा आर्थिक वापर;
आठ) परिवहन क्षेत्रात वैयक्तिक भागीदारी आणि सार्वजनिक भागीदारी प्रोत्साहन देताना जनतेच्या सुरक्षितता आणि समानपणा जपणे;
नऊ) परिवहन आणि जमिन वापर नियोजनासाठी एकात्मिक दृष्टीकोन ठेवणे;
दहा) राष्ट्रीय परिवहन निती (धोरण) ज्या आव्हांना दूर करु इच्छिते ती शोधणे;
अकरा) केन्द्र शासन ज्या विषयांशी सुसंगत असेल अशा इतर बाबींवर लक्ष देणे;)
———–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ३० अन्वये समाविष्ट करण्यात आले.