मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ६४ :
केंद्र सरकारचे नियम करण्याचे अधिकार :
केंद्र सरकारला पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही बाबीविषयी तरतूद करण्यासाठी नियम करता येतील, म्हणजेच,
(a)क) अ) कलम ४१, पोट-कलम (१) खाली अर्ज किती कालावधीत व कोणत्या नमुन्यात करता येईल आणि त्यासोबत सादर करावयाचे दस्तऐवज तपशील व माहिती;
(b)ख) ब) कलम ४१, पोट-कलम (३) खाली, नोंदणी प्रमाणपत्र ज्यात तयार करता येईल तो नमुना, त्यामध्ये अंतर्भूत करण्यात येईल अशी माहिती व तपशील, तो ज्याप्रकारे देण्यात येईल ती पद्धती;
(c)ग) क) कलम ४१, पोट-कलम (५) खाली, नोंदणी प्राधिकरणाच्या अभिलेखामध्ये, नोंदणी प्रमाणपत्राचा तपशील ज्यामध्ये नोंदण्यात येईल तो नमुना व पद्धती;
(d)घ) ड) कलम ४१, पोट-कलम (६) मध्ये निर्देशित केलेले, नोंदणी चिन्ह, अक्षरे व आकडे यामध्ये व इतर तपशील प्रदर्शित व दर्शित करावयाची पद्धती व नमुना;
(da)(घक) १.(डअ) कलम ४१ च्या पोटकलम (७) खाली, नोंदणी प्रमाणपत्राच्या वैधतेची तरतूद करणे;)
(e)ङ) ई) अर्ज किती कालावधीत आणि कशा नमुन्यात करता येईल आणि कलम ४१, पोट-कलम (८) मध्ये त्यामध्ये अंतर्भूत करावयाची माहिती व तपशील;
(ea)(ङक) १.(ईअ) कलम ४१ च्या पोटकलम (१०) खाली, विभिन्न प्रकारच्या मोटार वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्राचा नुतनीकरणाचा कालावधी;)
(f) च) फ) कलम ४१, पोट-कलम १४ मध्ये निर्देशिलेल्या अर्जाचा नमुना आणि त्यातील तपशील व माहिती व आकारावयाचे शुल्क;
(fa)चक) १.(फअ) कलम ४३ खाली तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र आणि तात्पुरते नोंदणी चिन्ह देणे;
(fb)चख) फब) कलम ४४ च्या पोटकलम (१) खालील अटी आणि शर्ती अन्वये प्राधिकृत विक्रेत्याने मोटार वाहनाची विक्री केली असेल तर ते वाहन नोंदणी प्राधिकरणापुढे सादर करण्याचची गरज नाही;)
(g)छ) ग) कलम ४७, पोट-कलम(१) मध्ये निर्देशिलेल्या अर्जाचा नमुना आणि तो करावयाचा कालावधी आणि त्यात अंतर्भूत करावयाचा तपशील.
(h)ज) ह) कलम ४८ च्या पोट-कलम (१) अन्वये ना-हरकत प्रमाणपत्रासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना व रीत आणि कलम ४८ च्या पोट-कलम (२) अन्वये द्यावयाच्या पावतीचा नमुना :
(i)झ) आय) कलम ४८ अन्वये ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येण्यापूर्वी अर्जदाराने अनुपालन करावयाच्या बाबी;
(j)ञ) जे) कलम ४९ पोट-कलम (१) अन्वये पत्त्यावर बदल कळविण्याचा नमुना आणि अर्जासह सादर करावयाचा दस्तऐवज;
(ja)(ञक) १.(जेअ) कलम ४९ च्या पोटकलम (१अ) अन्वये पत्त्यामधील बदलाची माहिती इलेक्ट्रानिक माध्यमातून सादर करण्याचा नमुना आणि पद्धत, आणि अशा माहिती सोबत सादर केले जाणारे दस्तावेज यांचा खरेपणाचा पुरावा देणे;)
(k)ट) के) कलम ४९ पोट कलम (१) अन्वये किंवा कलम ५० च्या पोट-कलम (२) अन्वये मालकी हस्तांतरणांसंबधी सूचना, नमुना व रीत आणि अर्जासह सादर करावयाचा दस्तऐवज;
(l)ठ) एल) कलम ५१, पोट-कलम (२) किंवा पोट-कलम (३) अन्वये करावयाच्या अर्जाना नमुना;
(la)ठक) १.(एलअ) कलम ५२ च्या पोटकलम (१) खाली मोटार वाहनातील बदलासाठी त्याच्या तपशील, मान्यतेच्या अटी, रेट्राफिटमेंट आणि त्यासंबंधीच्या इतर शर्ती;
(lb)ठख) एलब) कलम ५२ च्या पोटकलम (२) खाली कोणत्याही मोटार वाहनाच्या रुपांतरीत वाहनामध्ये बदल करण्याच्या अटी;)
(m)ड) एम) कलम ५६, पोट-कलम (१) अन्वये द्यावयाच्या योग्यता प्रमाणपचा नमुना आणि त्यामध्ये अंतर्भूत करावयाचा तपशील व बाबी;
(n)ढ) एन) कलम ५६ अन्वये देण्यात आलेले किंवा नवीकरण करण्यात आलेले योग्यता प्रमाणपत्र प्रभावी राहण्याचा कालावधी;
(na)ढक) १.(एनअ) कलम ५६ याच्या पोटकलम (६) खाली वाहतूक वाहनाच्या बॉडीवर लावले जाणारे सुभिन्न चिन्ह;
(nb)ढख) एनब) कलम ५६ च्या पोटकलम (७) खाली बिगर वाहतूक वाहनांना कलम ५६ मधील अटी लागू करने;
(nc)ढग) एनक) कलम ५९ च्या पोटकलम (४) खाली मोटार वाहनांचे किंवा त्यांच्या भागांचे आयुष्य समाप्ती व त्यांचे रिसायकलिंग करणे;)
(o)ण) ओ) नोंदणी प्रमाणपत्र देणे किंवा त्याचे नवीकरण करणे किंवा त्यात फेरबदल करणे किंवा नोंदणी प्रमाणपत्रावर मालकी हस्तांतरणाची नोंद करणे, भाडे-खरेदी, भाडेपट्टा किंवा तारणगहाण तत्त्वावरील करार संबंधात नोंदणी प्रमाणपत्रावर पृष्ठाकांन करणे किंवा ते रद्द करणे, नोंदणी चिन्हासाठी योग्यता प्रमाणपत्रे देणे आणि मोटार वाहनाची पाहणी आणि तपासणी करणे, यासाठी आकारावयाचे शुल्क व शुल्काचा परतावा;
(oa)णक)१.(ओअ) कलम ६२ब खाली येणाऱ्या कोणत्याही किंवा सर्व बाबी;
(ob)णख)ओब) कलम ६३ च्या पोटकलम (१) आणि (२) खाली येणाऱ्या कोणत्याही किंवा सर्व बाबी;)
(p)त) पी) केंद्र सरकारने विहित करावयाची किंवा त्यास विहित करता येईल अशी कोणतीही अन्य बाब.
———-
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २७ अन्वये समाविष्ट करण्यात आले.