मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ६१ :
अनुयानांना हे प्रकरण लागू करणे :
१) या प्रकरणातील तरतुदी, त्या जशा कोणत्याही इतर मोटार वाहनांच्या नोंदणीला लागू होतात, त्याचप्रमाणे अनुयायांच्या नोंदणीसह लागू होतील.
२) अनुयानास नेमून दिलेले नोंदणी चिन्ह, केंद्र सरकार विहित करील, अशा पद्धतीने कर्षण वाहनाच्या बाजूवर प्रदर्शित करण्यात येईल.
३) अनुयान किंवा अनुयाने ही ज्यास जोडलेली आहेत असे मोटार वाहन, चालविण्यात येत असल्यास, अशा प्रकारे चालविण्यात येणाऱ्या मोटार वाहनाचे नोंदणी चिन्ह अनुयानावर किंवा यथास्थिति अनुयानांच्या साखळांतील शेवटच्या अनुयानावर केंद्र सरकार विहित करील अशा पद्धतीने प्रदर्शित केलेले असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस चालविण्यात येणार नाही.