मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ५६ :
परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र :
१) कलम ५९ व ६० च्या उपबंधाच्या अधीनतेने, एखाद्या परिवहन वाहनाला ते त्या त्या वेळी या अधिनियमाच्या व त्याखाली केलेल्या नियमांच्या सर्व आवश्यकतांनुरुप आहे अशा आशयाचे केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा तपशील व माहिती असलेले, विहित प्राधिकरणाने किंवा पोटकलम (२) मध्ये उल्लेखिलेल्या प्राधिकृत चाचणी केन्द्राने दिलेले योग्यता प्रमाणपत्र मिळालेले नसेल तर कलम ३९ च्या प्रयोजनार्थ ते मोटारवाहन वैधरितीने नोंदलेले असल्याचे मानले जाणार नाही :
परंतु विहित प्राधिकरण किंवा प्राधिकृत चाचणी केन्द्र असे प्रमाणपत्र देण्याचे नाकारील तेथे, ते वाहनाच्या मालकाला अशा नकाराची कारणे लेखी कळवील :
१.(परंतु आणखी असे की, ज्या तारखे नंतर, जी केन्द्र सरकार द्वारा विहित केली जाईल, जोपर्यंत असे वाहन ऑटोमेटेड चाचणी केन्द्रावर करत नाही तोपर्यंत वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र दिले जाणार नाही.)
२.(२) पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेले प्राधिकृत चाचणी केन्द्र याचा अर्थ राज्य शासनाने प्राधिकृत केलेले स्वयंचलित चाचणी सुविधासह कोणतीही सुविधा, जेथे केन्द्र शासनाने मान्यता व नियंत्रणासाठी केलेल्या नियमांनुसार, फिटणेस चाचणी केन्द्र चालविले जाईल.)
३) पोटकलम (४) च्या उपबंधाच्या अधीनतेने, योग्यता प्रमाणपत्र केन्द्र शासनाने या अधिनियमाची उद्दिष्टे लक्षात घेऊन विहित केले असेल त्या कालावधीपुरते प्रभावी राहील.
४) विहित प्राधिकरण, कोणत्याही वेळी एखादे योग्यता प्रमाणपत्र ते ज्याच्याशी संबंधीत आहे असे वाहन या अधिनियमाच्या आणि त्याखाली केलेल्या नियमांच्या सर्व आवश्यकतानुरुप राहिलेले नाही अशी त्याची खात्री झाली तर, कारणे लेखी नमूद करुन रद्द करु शकेल. आणि ते रद्द झाल्यावर, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र आणि त्या वाहनाचच्या संबंधात प्रकरण पाच खाली देण्यात आलेल्या कोणताही परवाना नवीन योग्यता प्रमाणपत्र मिळेपर्यंत निलंबित असल्याचे मानले जाईल :
३.(परंतु विहित प्राधिकरणाद्वारे असे रद्दकरण तोपर्यंत केले जाणार नाही जोपर्यंत –
(a)क) अ) अशा विहित प्राधिकारी अशी टेक्निकल (तंत्रज्ञान) अर्हता प्राप्त नसेल, जो केन्द्र शासना द्वारा विहित केला जाईल आणी जिथे असा विहित प्राधिकारी टेक्निकल (तंत्रज्ञाप) अर्हता प्राप्त नसेल, तेथे असे रद्दकरण अर्हता प्राप्त असणाऱ्या अधिकाऱ्याच्या अहवालावर केले जाईल. आणि
(b)ख) ख) वाहनाच्या मालकाने, जे प्राधिकृत चाचणी केन्द्र निवडले असेल ते केन्द्र योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची लेखी कारणे देईल :
परंतु आणखी असे की, प्राधिकृत चाचणी केन्द्राने योग्यता प्रमाणपत्र रद्द केले असेल व ते कायम केले असेल तर ज्या वाहनाची चाचणी केली जात आहे त्याच्या चाचणीचा खर्च वाहन मालकाने सोसावयाचा आहे आणि पर्यायाने प्राधिकृत प्राधिकरणाने करावयाचा आहे.)
५) या अधिनियमाखाली देण्यात आलेले योग्यता प्रमाणपत्र ते प्रभावी असेतोवर, संपूर्ण भारतात विधिग्राह्य असेल.
४.(६) या कलमाखाली विधिमान्य दिलेले योग्यता प्रमाणपत्र चिन्ह सर्व वाहतूक वाहनांनी त्यांच्या बॉडीवर स्पष्ट व सहज दिसेल अशा पद्धतीने, केन्द्र शासनाने विहित केल्याप्रमाणे लावायचे आहे.
७) केन्द्र शासनाने विहित केलेल्या अटींना अधीन राहून, या कलमातील तरतुदी विगर वाहतूक वाहनांना लागू करता येतील.)
————
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २३ अन्वये परंतुक समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २३ अन्वये मूळ पोटकलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३, २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २३ अन्वये मूळ परंतुका ऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २३ अन्वये समाविष्ट करण्यात आले.