मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ५४ :
कलम ५३ अन्वये निलंबित केलेली नोंदणी रद्द करणे :
कलम ५३ अन्वये वाहनाच्या नोंदणीचे निलंबन जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अबाधितपणे चालू राहिले असेल, अशा बाबतीत नोंदणीचे निलंबन करण्याच्या वेळी ते वाहन ज्याच्या अधिकारक्षेत्रात होते ते नोंदणी प्राधिकरण, ते प्राधिकरण हे मूळ नोंदणी प्राधिकरण असल्यास नोंदणी रद्द करू शकेल आणि मूळ नोंदणी प्राधिकरण नसल्यास, त्या नोंदणी प्राधिकरणाकडे नोंदणी प्रमाणपत्र अग्रेषित करील व त्यास नोंदणी रद्द करता येईल.