Mv act 1988 कलम ५३ : नोंदणीचे निलंबन :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ५३ :
नोंदणीचे निलंबन :
१) कोणत्याही नोंदणी प्राधिकरणास किंवा अन्य विहित प्राधिकरणास असे समजऱ्यास कारण असेल की, त्याच्या अधिकारक्षेत्रातील कोणतेही वाहन-
(a)क) अ) अशा स्थितीत आहे की, त्याचा अधिकारक्षेत्रातील कोणतेही वाहन-जनतेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, किंवा ते हा अधिनियम, किंवा त्याखाली केलेले नियम यांच्या आवश्यकतानुसार नाही, किंवा
(b)ख) ब) भाडे किंवा बक्षीस म्हणून त्याचा वापर करण्याचा विधीग्राह्य परवाना नसतानादेखील तसा वापर करण्यात आला आहे किंवा वापर करण्यात येत आहे, तर प्राधिकरण, मालकास त्याच्या इच्छेनुसार जे कोणतेही अभिवेदन करावयाचे असेल, ते करण्यासाठी त्याला (नोंदणी प्रमाणपत्रात नमूद केलेल्या मालकाच्या पत्त्यावर पोचदेय नोंदणी डाकेने नोटीस पाठवून) संधी दिल्यानंतर, ते प्राधिकरण, लेखी स्वरूपात कारणे नमूद करून वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र –
एक) खंड (अ) खाली येणाऱ्या कोणत्याही प्रकरणी, त्याचे समाधान होईल इतपत दोष सुधारण्यात येईपर्यंत; आणि
दोन) खंड (ब) खाली येणाऱ्या कोणत्याही प्रकरणी, जास्तीत जास्त चार महिन्यांच्या कालावधीसाठी, निलंबित करू शकेल.
२) नोंदणी प्राधिकरणाखेरीज कोणतेही अन्य प्राधिकरण, पोट-कलम (१) खाली निलंबन आदेश देतेवेळी, निलंबनाच्या वेळी ते वाहन ज्याच्या अधिकारक्षेत्रामध्ये असेल, त्या नोंदणी प्राधिकाऱ्यास अशा निलंबनाचे वृत्त व त्याबाबतची माहिती कळवील.
३) मोटार वाहनाची नोंदणी किमान एक महिना एवढ्या सलग कालावधीपुरती पोट-कलम (१) अन्वये निलंबित करण्यात आली असेल, अशा बाबतीत वाहन निलंबित करऱ्यात आले, तेव्हा ते ज्याच्या अधिकारक्षेत्रामध्ये होते असे नोंदणी प्राधिकरण ते मूळ नोंदणी प्राधिकरण नसल्यास, त्या प्राधिकरणाला निलंबनाची माहिती कळवील.
४) मोटार वाहनाचा मालक, या कलमाखाली ज्याने वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित केले असेल, त्या नोंदणी प्राधिकाऱ्याने किंवा अन्य विहित प्राधिकरणाने मागणी केल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र स्वाधीन करील.
५) पोट-कलम (४) खाली स्वाधीन करण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र नोंदणीच्या निलंबनाचा आदेश विखंडित करण्यात येईल, अशा वेळी मालकाला परत करण्यात येईल; त्यापूर्वी नाही.

Leave a Reply