मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ५२ :
१.(मोटार वाहनातील फेरबदल :
१) कोणताही मोटार वाहन मालक, वाहनाच्या निर्मात्याने मूलत: विनिर्दिष्ट केलेल्या नोंदणी प्रमाणपत्रामधील तपशिलात तफावत होईल अशा प्रकारे त्यात भिन्न फेरबदल करणार नाही :
परंतु, वेगळ्या प्रकारचचे इंधन किंवा बॅटरी, संपीडित नैसर्गिक वायू (कॉम्प्रेस नॅचरल गॅस), सौर उर्जा किंवा द्रवरुप पेट्रोलियम वायू किंवा इतर प्रकारचे इंधन किंवा उर्जास्त्रोत याद्वारे वाहन चालविणे सुकर करण्यासाठी वाहनाच्या इंजिनात किंवा त्याच्या कोणत्याही भागात कन्वर्जन किट फिटमेंटद्वारे (संपरिवर्तन किट) केलेली सुधारणा ही विहित करण्यात येईल अशा शर्तीच्या अधीन राहून करण्यात येइल :
२.(परंतु असे की, केन्दशासन मोटार वाहनांमध्ये बदल करण्याबाबतचे विनिर्देश, मान्यतेसाठीच्या अटी, रेट्रोफिटमेंट आणि इतर संबंधित बाबी विहित करेल आणि अशा बाबतीत, निर्माणकत्र्याने दिलेली वॉरंटी (हमी) बदलासंबंधीतील किंवा रेट्रोफिटमेंटच्या बाबतीत शून्य समजली जाणार नाही : )
परंतु आणखी असे की, केन्द्र शासनाला कोणत्याही विनिर्दिष्ट प्रयोजनासाठी वर उल्लेखिलेल्या पेक्षा अन्य रितीने वाहनात बदल करण्याची सूट देता येईल.
(1A)१क)३.(१अ) मोटार वाहनाचा निर्माणकर्ता केन्द्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या निदेशांप्रमाणे, केन्द्र शासन द्वारा विनिर्दिष्ट केलेल्या मानकांप्रमाणे रेट्रोफिट सुरक्षा साधने किंवा इतर कोणतीही साधनांमध्ये बदल करेल.)
४.(२)पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही कोणतीही व्यक्ती, त्याच्या मालकीच्या कोणत्याही वाहनामध्ये नोंदणी प्राधिकरणाची मान्यता घेऊन फेरबदल करु शकेल किंवा रुपांतरीत करु शकेले :
परंतु असा फेरबदल किंवा असे रुपांतरण हे केन्द्र शासन विहित करील अशा अटींच्या अधीन असेल.)
३) मोटर वाहनातील कोणताही फेरबदल नोंदणी प्राधिकरणाची मान्यता न घेता करण्यात आले असतील ५.(***) तर अशा वाहनाच्या मालकाने असा फेरबदल केल्यापासून चौदा दिवसांच्या आत, तो ज्या अधिकारक्षेत्रात रहात असेल त्याच्या नोंदणी प्राधिकरणाला अशा फेरबदलाची माहिती देईल आणि त्या नोंदणी प्रमाणपत्रामध्ये नोंदणीच्या तपशीलाची नोंद ठेवण्यासाठी ते प्रमाणपत्र विहित केलेल्या फीसह त्याच्याकडे पाठविल.
४) मूळ नोंदणी प्राधिकरणा व्यतिरिक्त नोंदणी प्राधिकरण जे कोणी अशी नोंद करेल, त्या नोंदीचा तपशील मूळ नोंदणी प्राधिकरणाला पाठविल.
५) पोटकलम (१), (२), (३) व पोटकलम (४) खाली करण्यात आलेल्या उपबंधांना अधीन राहून भाडे-खरेदी करारावर वाहन धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती नोंदणीकृत मालकाच्या परवानगी शिवाय त्या वाहनात कोणताही फेरबदल करणार नाही.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, फेरबदल (परिवर्तन) याचा अर्थ वाहनाच्या संरचने मध्ये असा फेरबदल की ज्याच्या परिणामस्वरुप मूळ स्वरुपामध्ये बदल होतो.)
—————-
१. २००० चा अधिनियम क्रमांक २७ याच्या कलम २ अन्वये मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २१ अन्वये परंतुकाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २१ अन्वये मूळ पोटकलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
५. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २१ द्वारा वगळण्यात आले.