मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ४५ :
नोंदणी करण्याचे किंवा नोंदणी प्रमाणपत्राचे नवीकरण करण्याचे नाकारणे :
नोंदणी प्राधिकरणास, कोणत्याही मोटार वाहनाची नोंदणी करण्याचे किंवा (परिवहन वाहनाखेरीज अन्य) मोटार वाहनाच्या संबंधात नोंदणी प्रमाणपत्राचे नवीकरण करण्याचे, जर यांपैकी कोणत्याही बाबतीत, ते मोटार वाहन चोरीचे आहे किंवा यांत्रिकदृष्ट्या सदोष आहे किंवा या अधिनियमाच्या किंवा त्याखाली केलेल्या नियमांची आवश्यक केल्याप्रमाणे नाही असे मानण्यास नोंदणी प्राधिकरणास पुरेसे कारण असेल, किंवा अर्जदाराने कोणत्याही पूर्वीच्या नोंदणीचा तपशील पुरविण्यात कसूर केली असेल किंवा वाहनाच्या नोंदणीच्या किंवा यथास्थिति, नोंदणी प्रमाणपत्राच्या नवीकरणाच्या अर्जामध्ये चुकीचा तपशील दिला असेल अशा बाबतीत, आदेशाद्वारे, नाकारता येईल आणि नोंदणी प्राधिकरण, ज्याच्या वाहनाची नोंदणी करण्याचे नाकारण्यात आले असेल किंवा ज्याच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या नवीकरणाचा अर्ज नाकाराण्यात आला असेल, अशा अर्जदारास, अशा आदेशाची एक प्रत तशा नकाराच्या कारणांसह देईल.