Mv act 1988 कलम ४१ : नोंदणी कशी करावयाची :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ४१ :
नोंदणी कशी करावयाची :
१) मोटार वाहन मालकाने किंवा त्याच्या वतीने, नोंदणीसाठी करावयाचा अर्ज, केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा स्वरुपात असेल आणि त्याप्रमाणे दस्तऐवज, तपशील व माहिती त्या सोबत जोडण्यात येईल आणि विहित करण्यात येईल अशा कालावधीत तो करण्यात येईल :
परन्तु जहां मोटर यान संयुक्त रुप से एक से अधिक व्यक्तियों के स्वामित्वाधीन है, वहां आवेदन सभी स्वामियों की ओर से एक स्वामी द्वारा किया जाएगा और इस अधिनियम के प्रयोजनों के लिए ऐसे आवेदक को ऐसे मोटर यान का स्वामी समझा जाएगा :
१.( परंतु आणखी असे की, नवीन मोटर वाहनाच्या बाबतीत राज्यात नोंदणी अर्ज मोटार वाहनाच्या विक्रत्या मार्फत केला जाईल,
जर नवीन मोटर वाहनाची नोंदणी करावयाची असेल तर विक्रेता तेथीलच असेल.)
२) पोटकलम (१) मध्ये उल्लेखिलेल्या अर्जासोबत केन्द शासनाकडून विहित करण्यात येईल अशी फी असेल.
३) नोंदणी प्राधिकरण, २.(मालकाच्या नावाने नोंदणीपत्र) , केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा स्वरुपात आणि असा तपशील व अशी माहिती अंतर्भूत असलेले आणि अशा पद्धतीने नोंदणी प्रमाणपत्र देईल.
४) नोंदणी प्रमाणपत्रामध्ये समाविष्ट करावयाच्या इतर तपशिलाखेरीज त्यामध्ये मोटार वाहनाचा प्रकारही विनिर्दिष्ट करण्यात येईल व तो प्रकार म्हणजे मोटार वाहनाचचे संकल्पचित्र, बांधनी (रचना) व उपयोग या गोष्टी विचारा घेऊन, केन्द्र शासनाने शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील असा असेल.
५) नोंदणी प्राधिकरण, केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येइल अशा स्वरुपात व रीतीने ठेवावयाच्या नोंदवहीत पोटकलम (३) मध्ये निर्दिष्ट केलेल्या प्रमाणपत्राच्या तपशिलाची नोंद करील.
६) नोंदणी प्राधिकरण, त्या वाहनाला, त्यावर दाखविण्यासाठी केन्द्र शासनाने शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे त्या त्या राज्यास वेळोवेळी नेमून देईल अशा अक्षरांच्या समूहापैकी एक अक्षर समूह व त्यापुढे अशी अक्षरे व आकडे यांनी बनवलेले एक विभेदक चिन्ह (या अधिनियमा नोंदणी चिन्ह म्हणून निर्देशिलेले) नेमून देईल आणि केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा स्वरुपात व अशा पद्धतीने मोटार वाहनावर ते प्रदर्शित करण्यात व दर्शविण्यात येईल :
३.( परंतु नवीन मोटार वाहनाच्या बाबतीत पोटकलम (१) च्या दुसऱ्या परंतुका अन्वये नोंदणीचा अर्ज केला असेल असे मोटार वाहन अशा नोंदणीची खूण केन्द्र शासनाने विहित केलेल्या नमुन्यात व पद्धतीत केल्याशिवाय मालकाच्या ताब्यात दिले जाणार नाही.)
७) ४.(***) एखाद्या मोटार वाहनाच्या संबंधात पोटकलम (३) खाली देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र मग ते या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी वा नंतर दिलेले असो – या अधिनियमात समाविष्ट असलेल्या उपबंधांच्या अधीनतेने, ते दिल्याच्या दिनांकापासून फक्त पंधरा वर्षाच्या कालावधीपूरते ५.(किंवा अशा कालावधी पूरते जे केन्द्र शासन द्वारा विहित केले जाईल) विधिग्राह्य असेल आणि ते नूतनीकरणपात्र असेल.
८) ४.(***) एखाद्या मोटार वाहनाच्या मालकाने किंवा त्याच्या वतीने नोंदणी प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी करावयाचा अर्ज केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा कालावधीत आणि अशा स्वरुपात आणि अशा तपशिलासह व माहितीसह करण्यात येईल.
९) पोटकलम (८) मध्ये उल्लेखिलेल्या अर्जासोबत केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशी फी असेल.
१०) कलम ५६ च्या उपबंधाच्या अधीनतेने, पोटकलम (८) खालील अर्ज मिळाल्यानंतर नोेंदणी प्राधिकरणाला नोंदणी प्रमाणपत्राचे ६.(असा कालावधीसाठी, जो केन्द्र शासन विहित करेल) नूतनीकरण करता येईल आणि ही गोष्ट ते मूळ नूतनीकरण प्राधिकरण नसल्यास, मूळ नूतनीकरण प्राधिकरणाला कळवील :
७.(परंतु, केन्द्र शासन वेगवेगळ्या मोटार वाहनांसाठी नूतनीकरणाचा कालावधी वेगवेगळा विहित करु शकेल.)
८.(***)
१४) नोंदणी प्रमाणपत्राच्या दुसऱ्या प्रतीसाठी ९.(अखेरच्या नोंदणी प्राधिकरणाकडे) केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशा प्रपत्रात (नमुन्यात) तसा तपशील व माहिती अंतर्भूत असलेला आणि विहित करण्यात येईल अशा फीसह, अर्ज करण्यात येईल.
———
१. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम १७ अन्वये परंतुक समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम १७ अन्वये मूळ मजकूराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम १७ अन्वये परंतुक समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम १७ अन्वये वगळण्यात आले.
५. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम १७ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
६. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम १७ अन्वये मूळ मजकूराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
७. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम १७ अन्वये परंतुक समाविष्ट करण्यात आले.
८. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम १७ अन्वये वगळण्यात आले.
९. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ११ अन्वये मूळ मजकूराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply