Mv act 1988 कलम ३५ : न्यायालयाचा अनर्ह ठरवण्याचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ३५ :
न्यायालयाचा अनर्ह ठरवण्याचा अधिकार :
१) वाहकाचे लायसन धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या अधिनियमाखालील अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आले असेल अशाबाबतीत, ज्या न्यायालयाने अशा व्यक्तीस दोषी ठरविले त्या न्यायालयास, कायद्याने प्राधिकृत केलेल्या कोणतीही इतर शिक्षा लादण्याबरोबरच, अशाप्रकारे दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तीला, न्यायालय विनिर्दिष्ट करील अशा कालावधीसाठी, वाहकाचे लायसन धारण करण्यासाठी अशी व्यक्ती अनर्ह असल्याचे जाहीर करता येईल.
२) या अधिनियमाखालील अपराधाच्या दोषसिद्धच्या संबंधात ज्याकडे अपील केले असेल त्या न्यायालयास, खालच्या न्यायालयाने काढलेला निरर्हतेसंबंधीचा कोणताही आदेश रद्द करता येईल किंवा त्यामध्ये फेरबदल करता येईल अशा न्यायालयाकडून ज्या न्यायालयाकडे सर्वसामान्यपणे अपील करता येते त्या न्यायालयास, ज्याच्या संबंधात असा आदेश काढण्यात आला त्या दोषसिद्धीविरूद्ध अपील करता येत नसले करीदेखील, त्या खालच्या न्यायालयाने काढलेला आदेश रद्द करता येईल किंवा त्यात फेरबदल करता येईल.

Leave a Reply