मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम ३३ :
वाहकाची (कंडक्टर) लायसने नाकारणे इ. संबंधीचे आदेश व त्यावरील अपिले :
१) लायसन देणारे, प्राधिकरण, कोणतेही वाहकाचे लायसन देण्याचे किंवा त्याचे नवीकरण करण्याचे नाकारत असेल किंवा ते रद्द करीत असेल अशाबाबतीत, त्यास, अर्जदारास किंवा यथास्थिति, धारकास, अशाप्रकारे नवीकरणास नकार देण्यासंबंधीची किंवा रद्द करण्याविषयीची लेखी स्वरूपातील कारणे दिलेला आदेश पाठवून तसे करता येईल.
२) पोट-कलम (१) अन्वये काढलेल्या आदेशामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याला आदेश बजावल्यापासून तीस दिवसांच्या आत, विहित प्राधिकाऱ्याकडे अपील करता येईल व तो प्राधिकारी, अशा व्यक्तीस व ज्याने तो आदेश काढला त्या प्राधिकाऱ्यास सुनावणीची संधी दिल्यानंतर अपिलावर निर्णय देईल आण अपील प्राधिकाऱ्याने दिलेला निर्णय, ज्याने तो आदेश काढला त्या प्राधिकरणावर बंधनकारक राहील.