मोटार वाहन अधिनियम १९८८
प्रकरण ३ :
टप्पा वाहनांच्या वाहकांची लायसने :
कलम २९ :
वाहकाच्या लायसनची आवश्यकता:
१) कोणतीही व्यक्ती, असा वाहक म्हणून कार्य पार पाडण्यास त्याला प्राधिकृत करण्याकरिता देण्यात आलेले वाहकाचे प्रभावी लायसन धारण करीत असल्याखेरीज टप्पा वाहनाचा हक्क म्हणून कार्य पार पाडणार नाही; आणि कोणतीही व्यक्ती, अशा प्रकारे लायसन देण्यात न आलेल्या कोणत्यही व्यक्तीला टप्पा वाहनाचा वाहक म्हणून सेवेत ठेवणार नाही किंवा त्यासाठी परवानगी देणार नाही.
२) राज्य शासन, ज्यांच्या अधीनतेने, वाहकाची कामे पार पाडणाऱ्या टप्पा वाहनाच्या चालकाला किंवा एक महिन्यापेक्षा अधिक होणार नाही एवढ्या कालावधीसाठी वाहक म्हणून कार्य पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीला पोट-कलम (१) लागू होणार नाही अशा अटी विहित करील.