मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २५क :
१.(ड्राइव्हिंग लायसन चे राष्ट्रीय रजिस्टर (नोंदवही):
१) केन्द्र शासन राष्ट्रीय ड्राइव्हिंग लायसनचे रजिस्टर (नोंदवही) विनिर्दिष्ट केलेल्या नमुन्यात आणि पद्धतीत ठेवेल.
२) सर्व राज्यांचे ड्राइव्हिंग लायसनचे रजिस्टर केन्द्रशासन अधिसूचित करील त्या दिनांकापर्यंत राष्ट्रीय ड्राइव्हिंग लायसन रजिस्टरमध्ये अंतर्भूत केले जाईल.
३) या अधिनियमाखाली दिलेले किंवा नुतनीकरण केलेले वाहन चालविण्याचे लायसन विधिमान्य होणार नाही जोपर्यंत राष्ट्रीय ड्राइव्हिंग लायसन रजिस्टर अन्वये विशिष्ट लायसन क्रमांक दिला जात नाही.
४) या अधिनियमाखाली सर्व राज्य सरकार आणि लायसन प्राधिकरण केन्द्र शासनाने विहित केलेल्या नमुन्यात आणि पद्धतीमध्ये राज्य ड्राइव्हिंग लायसन रजिस्टर मधील सर्व माहीती, समाविष्ट डेटासह प्रसारित करेल.
५) राज्य सरकारला राष्ट्रीय रजिस्टरमधील माहीती मिळविण्याचा आणि केन्द्र सरकारने विहित केलेल्या पद्धतीने त्यांचे रेकॉर्ड अद्ययावर करण्याचा अधिकार असेल.)
——–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम १२ अन्वये समाविष्ट करण्यात आले.