मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २१७ :
निरसन व व्यावृत्ती :
१) मोटार वाहन अधिनियम, १९३९ (१९३९ चा ४) आण हा अधिनियम एखाद्या राज्यात अमलात येण्याच्या लगतपूर्वी त्या राज्यात अमलात असलेला या अधिनियमाशी अनुरूप असा अन्य कोणताही कायदा (या कलमात यापुढे निरसित अधिनियम म्हणून निर्दिष्ट करण्यात आलेला) याद्वारे निरसित करण्यात येत आहे.
२) निरसित अधिनियमाच्या पोट-कलम (१) द्वारे निरसन करण्यात आलेले असले तरी-
(a)क)अ) निरसित अधिनियमाद्वारे काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना, करण्यात आलेला नियम, विनियम काढण्यात आलेला आदेश किंवा देण्यात आलेली नोटीस किंवा करण्यात आलेली कोणतीही नेमणूक किंवा घोषणा किंवा देण्यात आलेली सूट किंवा करण्यात आलेलाी कोणतीही जप्ती किंवा लादण्यात कोणतीही शास्ती किंवा दंड, कोणतेही समपहरण, रद्द करणे किंवा केलेले कोणतीही गोष्ट किंवा केलेली आलेली कोणतीही कार्यवाही जी अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी अमलात असेल ती या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसेल तितपत, या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसेल तितपत, या अधिनियमाच्या अनुरूप तरतुदींद्वारे काढण्यात, देण्यात किंवा घेण्यात आल्याचे मानण्यात येईल.
(b)ख)ब) निरसित अधिनियमान्वये काढण्यात किंवा देण्यात आलेले कोणतेही पात्रता प्रमाणपत्र किंवा नोंदणी किंवा लायसन किंवा परवाना अशा प्रारंभानंतर, हा अधिनियम संमत करण्यात आला नसता तर ज्या स्थितीत व ज्या कालावधीसाठी प्रभावी राहिले असते तसेच प्रभावी राहतील;
(c)ग) क) कोणत्याही दस्तऐवजात कोणत्याही निरसित अधिनियमितीचा किंवा त्याच्या तरतुदींचा निर्देश करण्यात आला असल्यास तो या अधिनियमाच्या आणि या अधिनियमाच्या तदनुरूप तरतुदींचा संदर्भ आहे असे समजून त्यांचा अर्थ लावण्यात येईल,
(d)घ) ड) नोंदणी करणाऱ्या प्राधिकरणाने नेमून दिलेली विभेदक चिन्हे निरसित अधिनियमाच्या तरतुदींनुसार मोटार वाहनावर ती दर्शविण्याची रीत ही, हा अधिनियम अमलात आल्यानंतर या अधिनियमाच्या कलम ४१ च्या पोट-कलम (६) नुसार अधिसूचना काढण्यात येईपर्यंत तपशील अमलात राहील.
(e)ड) ई) मोटार वाहन अधिनियम १९३९ (१९३९ चा ४) याच्या कलम ६८-क नुसार किंवा कोणत्याही राज्यात अमलात असलेल्या कोणत्याही अनुरूप कायद्यान्वये करण्यात आलेली आणि या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी प्रलंबित असलेली कोणतीही योजना या अधिनियमाच्या कलम १०० च्या तरतुदींनुसार निकालात काढण्यात येईल.
(f)च) फ) मोटार वाहन अधिनियम, १९३९ (१९३९ चा ४) याचे कलम ६८ – फ पोट-कलम (१ अ नुसार किंवा तदनुरूप कायदा कोणताही असल्यास त्यानुसार दिलेले आणि या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी कोणत्याही) राज्यात अमलात असलेला कोणताही परवाना या अधिनियमाच्या प्रकरण सहा अन्वये मान्य करण्यात आलेली योजना प्रसिद्ध करण्यात येईपर्यंत अमलात येईपर्यंत अमलात असणे चालू राहील.
३) कोणत्याही निरसित अधिनियमितीनुसार देय असलेली कोणतीही शास्ती या अधिनियमाद्वारे किंवा अन्वये तरतूद करण्यात आलेल्या रीतीने परंतु अशा शास्तीच्या वसुलीसाठी निरसित अधिनियमानुसार यापूर्वीच केलेल्या कार्यवाहीस बाध न आणता वसूल करता येईल.
४) या कलमात करण्यात आलेली विशिषट बाबीची नोंद, सर्वसाधारण परिभाषा अधिनियम, १८९७ (१८९७ चा १०) च्या निरसनाच्या परिणामांच्या संबंधातील कलम ६ च्या सर्वसाधारण प्रयुक्ततेला प्रतिबंध करतात किंवा त्यावर परिणाम करतात असे मानण्यात येणार नाही.