Mv act 1988 कलम २१५ : मार्ग सुरक्षा परिषदा व समित्या :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २१५ :
मार्ग सुरक्षा परिषदा व समित्या :
१) केंद्र शासन शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून देशासाठी, अध्यक्ष अणि त्या शासनाला आवश्यक वाटीतल अशा सदस्यांचा समावेश असलेल्या, आणि ते शासन घालून देईल अशा अटी व शर्तींवरील एका राष्ट्रीय मार्ग सुरक्षा परिषदेची स्थापना करू शकेल.
२) राज्य शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, राज्यासाठी अध्यक्ष आणि त्या शासनाला आवश्यक वाटतील अशा सदस्यांचा समावेश असलेल्या आणि ते शासन निर्धारीत करील अशा अटी व शर्तीवरील राज्य मार्ग सुरक्षा परिषदेची स्थापना करील.
३) राज्य शासन शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी, अध्यक्ष आणि ते राज्य शासन आवश्यक मानीत अशा सदस्यांचा समावेश असलेली आणि राज्य शासन निर्धारित करील अशा अटी व शर्तींवरील जिल्हा मार्ग सुरक्षा समितीची स्थापना करील.
४) या कलमामध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या परिषदा व समित्या, केंद्र शासन किंवा यथास्थिती राज्य शासन या अधिनियमाची उद्दीष्टे लक्षात घेऊन विनिर्दिष्ट करील अशी मार्ग सुरक्षा कार्यक्रमाशी संबंधित कार्य पार पाडील.

Leave a Reply