Mv act 1988 कलम २११ : फी आकारण्याचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८
प्रकरण १४ :
संकीर्ण :
कलम २११ :
फी आकारण्याचा अधिकार :
केंद्र शासनाला किंवा राज्य शासनाला या अधिनियमान्वये जे करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले असतील असा प्रत्येक नियम, तशा आशयाची कोणतीही स्पष्ट तरतूद करण्यात आलेली नसली तरी, अर्ज, सुधारणा, दस्तऐवज, प्रमाणपत्रे, लायसने, परवाने, चाचण्या, पृष्ठांकने, बिल्ले, पट्ट्या प्रतिस्वाक्षाऱ्या, प्राधिकृती देणे, आकडेवारी, दस्तऐवजांच्या प्रती, आदेश पुरविणे यासाठी या अधिनियमान्वये किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमांन्वये अधिकाऱ्यांनी किंवा प्राधिकणांनी सेवा देण्याचा समावेश असलेल्या इतर कोणत्याही प्रयोजनासाठी किंवा बाबीसाठी आवश्यक मानण्यात येईल अशी फी आकारण्यासाठी तरतूद करता येईल.
परंतु, असे की, शासनाला तसे करणे आवश्यक वाटेल तर, लोकहितासाठी, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे, अशी कोणतीही फी एकतर पूर्णपणे किंवा अंशत: देण्यापासून व्यक्तींच्या कोणत्याही वर्गाला सूट देता येईल.

Leave a Reply