Mv act 1988 कलम २१० : न्यायालयाने दोषसिद्धीबाबत कळविणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २१० :
न्यायालयाने दोषसिद्धीबाबत कळविणे :
मोटार वाहन चालकाचे लायसन धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या अधिनियमाखालील अपराधासाठी किंवा जो अपराध करण्यासाठी मोटार वाहनाचा वापर करण्यात आला असेल अशा अपराधासाठी सिद्धदोष ठरविणाऱ्या प्रत्येक न्यायालयाने –
(a)क)अ) चालकाचे लायसन देणाऱ्या प्राधिकरणास; आणि
(b)ख)ब) जिने लायसनचे शेवटी नवीकरण केले असेल अशा लायसन देणाऱ्या प्राधिकरणाकडे.
तशी सूचना पाठविली पाहिजे आणि अशा प्रत्येक सूचनेमध्ये लायसन धारण करणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता, लायसन क्रमांक, लायसन देण्याची तारीख व त्याच्या नवीकरणाची तारीख, अपराधाचे स्वरूप, त्यासाठी देण्यात आलेली शिक्षा आणि विहित करण्यात येतील असे अन्य तपशील नमूद केले पाहिजेत.

Leave a Reply