मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २०८ :
प्रकरणे संक्षिप्तपणे निकालात काढणे :
१) अधिनियमान्वये कोणत्याही अपराधाची (या बाबतीत केंद्र शासन नियमांद्वारे विनिर्दिष्ट करील अशा अपराधांखेरीज) दखल घेणारे न्यायालय-
एक) तो अपराध या अधिनियमान्वये कारावासाची शिक्षा देण्याजोगा अपराध असेल, तर पुढील आरोपी व्यक्तीवर बजावावयाच्या समन्सवर पुढील गोष्टी नमूद करू शकेल; आणि
दोन) इतर कोणत्याही प्रकरणात आरोपी व्यक्तीवर बजावावयाच्या समन्सवर पुढील गोष्टी नमूद करण्यात आल्या पाहिजेत त्या म्हणजे –
(a)क)अ) तो अधिवक्त्यामार्फत किंवा स्वत: उपस्थित राहू शकेल; किंवा
(b)ख)ब) आरोपफत्राची सुनावणी होण्यापूर्वी विनिर्दिष्ट करण्यात येईल, अशा तारखेपर्यंत त्याला आरोप कबूल करता येईल आणि न्यायालय विनिर्दिष्ट करील अशी रक्कम (त्या अपराधासाठी आकारता येईल अशा कमाल दंडाच्या रकमेपेक्षा अधिक नसेल अशी रक्कम) धनादेशाद्वारे न्यायालयाकडे भरता येईल आणि धनादेश पत्रावरच आरोप कबूल असल्याचे दर्शविता येईल:
परंतु असे की, पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या कोणत्याही आरोपाच्या बाबतीत, समनसवर असेही नमूद करू शकेल की, आरोपीला दोषारोप कबूल करावयाचा असेल तर तो खंड (ब) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या रीतीने अपराध कबूल करू शकेल आणि अशा कबुलीचा समावेश असलेल्या आपल्या पत्रासह आपले चालकाचे लायसन न्यायालयाकडे पाठवू शकेल..
२) पोट-कलम (१) नुसार कार्यवाही करण्यात आलेला अपराध हा केंद्र शासनाने या पोट-कलमाच्या प्रयोजनांसांी नियमांद्वारे विनिर्दिष्ट केलेला अपराध असेल अशा बाबतीत, जर आरोपी व्यक्तीने दोषारोप मान्य केला असेल आणि आपले चालकाचे लायसन आपल्या दोषारोप स्वीकृती पत्रासह न्यायालयाकडे अग्रेषित असेल अशा बाबतीत, न्यायालय तशा दोषसिद्धीचे पृष्ठांकन त्याच्या चालकांच्या लायसनवर करील.
३) आरोपी व्यक्ती दोषारोप मान्य करील आणि विनिर्दिष्ट करण्यात आलेली रक्कम भरील आणि तिने पोट-कलम (१) किंवा यथास्थिती पोट-कलम (१) व (२) यामधील तरतुदींचे पालन केले असेल आ बाबतीत, त्या अपराधाच्या संबंधात त्या व्यक्तीविरूद्ध कोणतीही आणखी कार्यवाही करण्यात येणार नाही आणि या अधिनियमात या विरूद्द काहीही अंतर्भूत असले तरीही तिने अपराध कबूल केले एवढ्याच केवळ कारणावरून ती लायसन धारण करण्यास किंवा प्राप्त करण्यास अपात्र ठरणार नाही.