Mv act 1988 कलम २०५ : वाहन चालवण्यास लायक नसल्याबद्दल गृहीतक :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २०५ :
वाहन चालवण्यास लायक नसल्याबद्दल गृहीतक :
कलम १८५ खाली शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधासंबंधीच्या खटल्यामध्ये असे शाबीत झाले की, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने आरोपीला कोणत्याही वेळी श्वासाच्या चाचणीसाठी त्याच्या उच्छवासाचा नमुना घेतला जाण्यास किंवा प्रयोगशाळेत करावयाच्या चाचणीसाठी त्याच्या रक्ताचा नमुना पुरवण्यास संमती देण्याची विनंती केली असात त्या आरोपीने अशी संमती देण्याचे नाकारले होते, टाळले होते किंवा ती दिली नव्हती, तर त्याचा नकार, टाळाटाळ किंवा कसूर याबद्दल रास्त कारण दाकवण्यात न आल्यास ती वस्तुस्थिती म्हणजे आरोपीच्या त्या वेळच्या स्थितीबाबत फिर्यादी पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या कोणत्याही पुराव्याला पुष्टी देणारी परिस्थिती किंवा बचाव पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या कोणत्याही पुराव्याचे खंडन करणारी परिस्थिती आहे, असे गृहीत धरले जाईल.

Leave a Reply