Mv act 1988 कलम २०४ : प्रयोगशाळेत करवायाची चाचणी :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २०४ :
प्रयोगशाळेत करवायाची चाचणी :
१) कलम २०३ खाली अटक झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत :
(a)क)अ) तिच्या श्वासाची चाचणी ज्या साधनाच्या मदतीने घेण्यात आली होती ते साधन अशा व्यक्तीच्या रक्तामध्ये अल्कोहोल दर्शविते असे पोलीस अधिकाऱ्याला दिसून आले किंवा
(b)ख)ब) अशा व्यक्तीला श्वासाची चाचणी करून घेण्याची संधी दिली असता तिने तसे करण्याचे नाकारले असेल, ते टाळले असेल किंवा तसे केले नसेल;
तर तो पोलीस अधिकारी, त्या व्यक्तीला, ती पोलीस ठाण्यावर असताना, तो हजर करील अशा नोंदलेल्या वैद्यक व्यवसायीकडे तिच्या रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत करावयाच्या चाचणीसाठी देण्यास फर्मावू शकेल.
परंतु, असा नमुना देण्यास फर्मावण्यात आलेली व्यक्ती स्त्री असेल आणि अशा पोलीस अधिकाऱ्याने हजर केलेला नोंदलेला वैद्यक व्यवसायी हा पुरूष असेल तेव्हा असा नमुना एखाद्या स्त्रीच्या समक्षच घेण्यात आला पाहिजे मग ती वैद्यक व्यवसायी असो किंवा नसो.
२) एखादी व्यक्ती आंतररूग्ण म्हणून रूग्णालयात दाखल झालेली असताना,
(a)क)अ) त्या व्यक्तीच्या श्वासाची चाचणी ज्या साधनाच्या मदतीने घेतली ते साधन तिच्या रक्तामध्ये अल्कोहोल असल्याचे दर्शवते असे पोलीस अधिकाऱ्याला आढळून आल्यास; किंवा
(b)ख)ब) त्या व्यक्तीला श्वासाच्या चाचणीसाठी रूग्णालयात किंवा अन्यत्र नमुना देण्यास फर्मावले असता त्या व्यक्तीने तसे करण्यास नकार दिला असेल, ते टाळले असेल किंवा तसे केले नसेल, आणि तिच्या रक्तामध्ये अल्कोलहोल आहे असा संशय पोलीस अधिकाऱ्याला रास्त कारणावरून वाटत असेल तर;
तो पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला तिच्या रक्ताचा नमुना प्रयोगशाळेत करावयाच्या चाचणीसाठी देण्यास फर्मावू शकेल:
परंतु ती व्यक्ती रूग्ण म्हणून प्रत्यक्षपणे ज्याच्या ताब्यात असेल त्या नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीला, त्या रूग्णाला नमुना देण्याबाबत फर्मावण्यात आल्याचे प्रथम कळवलेले नसल्यास किंवा तो नमुना पुरवण्यामुळे किंवा पुरवण्यास फर्मावल्यामुळे रूग्णाची नीट देखभाल करण्याच्या किंवा त्याच्यावर योग्य उपचार करण्याच्या कामावर प्रतिकूल परिणाम होईल या कारणावरून त्या वैद्यक व्यवसायीने, नमुना पुरवण्यास हरकत घेतल्यास, त्या व्यक्तीला या पोट-कलमासाठी प्रयोगशाळेतील चाचणीसाठी तिच्या रक्ताचा नमुना पुरवण्यास फर्मावण्यात येणार नाही.
३) या कलमानुसार केलेल्या, प्रयोगशाळेतील चाचणीचा निष्कर्ष पुरावा म्हणून ग्राह्य असेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनांसाठी प्रयोगशाळेत करावयाची चाचणी या शब्दप्रयोगाचा अर्थ, केंद्र सरकारने किंवा राज्य शासनाने स्थापन केलेल्या चालवलेल्या किंवा मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेत करण्यात आलेले रक्ताच्या नमुन्याचे विशलेषण, असा आहे.

Leave a Reply