मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २०२ :
वॉरंटाशिवाय अटक करण्याचा अधिकार :
१) वर्दी घातलेल्या पोलीस अधिकाऱ्यासमक्ष जी कोणतीही व्यक्ती कलम १८४ किंवा कलम १८५ किंवा कलम १९७ खाली शिक्षापात्र असलेला अपराध करील त्या व्यक्तीला तो पोलीस अधिकारी वॉरंटाशिवाय अटक करू शकेल :
परंतु, कलम १८५ खाली शिक्षायोग्य असलेल्या अपराधाच्या संबंधात अशा प्रकारे अटक करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीची, तिच्या अटकेपासून दोन तासांच्या आत, नोंदरलेल्या वैद्यक व्यवसायीकडून कलम २०३ आणि २०४ यामध्ये उल्लेख करण्यात आलेली वैद्यकीय तपासणी करील आणि अशी तपासणी न झाल्यास त्याची कोठडीतून ताबडतोब मुक्तता करण्यात येईल.
१.(२) या अधिनियमाखालील अपराध केलेला आहे. अशा कोणत्याही व्यक्तीने तिचे नाव व पत्ता देण्याचे नाकारल्यास वर्दीत असलेला पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला वॉरंटशिवाय अटक करू शकेल.)
३) मोटार वाहनाच्या चालकाला वॉरंटशिवाय अटक करणारा पोलीस अधिकारी त्या परिस्थितीत आवश्यक असेल तर, वाहनाची तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी त्याला योग्य वाटेल अशी कोणतीही उपाययोजना करील किंवा करवून घेईल.
————
१. १९९४ चा अधिनियम क्रमांक ५४ याच्या कलम ६० अन्वये मूळ पोटकलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.