मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम २०० :
विवक्षित अपराधांच्या बाबतीत तडजोड करणे :
१)१.(कलम १७७, कलम १७८, कलम १७९, कलम १८०, कलम १८१, कलम १८२, कलम १८२अ च्या पोटकलम (१) किंवा पोटकलम (३) किंवा पोटकलम (४) , कलम १८२ब, कलम १८३ चा पोटकलम (१) किंवा पोटकलम (२), कलम १८४, कलम १८६, कलम १८९, कलम १९० चा पोटकलम (२), कलम १९२, कलम १९२अ, कलम १९४, कलम १९४अ, कलम १९४ब, कलम १९४क, कलम १९४ड, कलम १९४ई, कलम १९४फ, कलम १९६ किंवा कलम १९८) खाली या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा त्यानंतर कोणताही शिक्षापात्र अपराध घडला असेल तर, त्यावर खटला भरण्यात येण्यापूर्वी किंंवा त्यानंतर, राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे याबाबत विनिर्दिष्ट करील असे अधिकारी किंवा प्राधिकारी आणी अशा रकमेवर, तो अपराध आपसात मिटवू शकतील :
२.(परंतु राज्य शासन अशा रकमे व्यतिरिक्त, अपराधी कडून सामुदायिक सेवेचा कालावधी साठी वचनबद्ध करण्याची अपेक्षा करु शकेल.)
२) जेव्हा पोटकलम (१) खाली अपराधात तडजोड करण्यात आली असेल तेव्हा, जर अपराधी अभिरक्षेत असेल तर, त्याला विमुक्त करण्यात येईल आणि अशा अपराधाच्या संबंधात त्याच्या विरुद्ध आणखी कोणतीही कार्यवाही होती घेण्यात येणार नाही :
३.(परंतु या कलमान्वये तडजोड झाली असली तरी, असा अपराध पूर्वी अशा स्वरुपाचा होता, हा अपराध पोठोपाठ घडणारा अपराध आहे असे समजले जाईल :
परंतु आणखी असे की,कोणत्याही अपराधाची तडजोड कलम २०६ पोटकलम (४) खाली कार्यवाहीपासून सूटका मिळणार नाही किंवा चालक रिफे्रशर प्रशिक्षण कोर्स पूर्ण करण्याची जाबाबदारी असेल किंवा लागू असल्यास सामुदायिक सेवा पूर्ण करावी लागेल.)
———
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८६ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८६ अन्वये परंतुक समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८६ अन्वये परंतुक समाविष्ट करण्यात आले.