Mv act 1988 कलम (२क) २अ : १.(ई-गाडी आणि ई-रिक्षा :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम (२क) २अ :
१.(ई-गाडी आणि ई-रिक्षा :
१) कलम ७ चा पोटकलम (१) चे परंतुक आणि कलम ९ चा पोटकलम (१०) मध्ये जसे अन्यथा उपबंधित आहे, त्या शिवाय, या अधिनियमाचे उपबंध (तरतुदी) ई-गाडी आणि ई-रिक्षा यांना लागू असतील.
२) या कलमाच्या प्रयोजनासाठी ई-गाडी आणि ई-रिक्षा म्हणजे भाड्याने किंवा पारिश्रमिक म्हणून, यथास्थिति, माल किंवा प्रवाशांना वाहून नेण्याच्या उद्देशाने, ज्या या निमित्त विहित केली जाईल अशी तीन चाके असलेली ४००० वॅटपेक्षा जास्त विद्युत शक्ति नसलेली विशेष प्रयोजना साठी बनविलेली, निर्मित किंवा रुपांतरित, सुसज्जित आणि अनुरक्षित, बैटरी युक्त वाहन अभिप्रेत आहे.)
———–
१. २०१५ चा अधिनियम क्रमांक ३ च्या कलम २ द्वारा समाविष्ट करण्यात आला.(०१-०१-२०१५ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply