Mv act 1988 कलम १९ : चालकाचे लायसन धारण करण्यास अपात्र ठरविण्याचा किंवा असे लायसन रद्द करण्याचा लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचा अधिकार :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९ :
चालकाचे लायसन धारण करण्यास अपात्र ठरविण्याचा किंवा असे लायसन रद्द करण्याचा लायसन देणाऱ्या प्राधिकरणाचा अधिकार :
चालकाचे लायसन धारकाला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर जर लायसन प्राधिकरणाची अशी खात्री झाली असेल की,-
(a)क) अ) ती व्यक्ती सराईत गुन्हेगार किंवा अट्टल (सराईत) दारुबाज आहे; किंवा
(b)ख) ब) त्या व्यक्तीला गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ यात दिलेल्या अर्थानुसार कोणत्याही गुंगीकारक औषधीद्रव्याचे किंवा मनोव्यापारावर परिणाम करण्याऱ्या पदार्थाचे व्यसन आहे; किंवा
(c)ग) क) ती व्यक्ती दखली गुन्हा करण्याच्या कामी ते मोटार वाहन वापरीत आहे किंवा तिने तसे ते वापरले होते; किंवा
(d)घ) ड) मोटार वाहनाचा चालक म्हणून तिने पूर्वी केलेल्या वर्तनावरुन तिने वाहन चालवल्यामुळे लोकांना धोका पोचण्याचा संभव आहे, हे दाखवून दिले आहे; किंवा
(e)ड) इ) त्या व्यक्तीने, कपटाने किंवा अपवेदनाने, विशिष्ट वर्गाचे किंवा वर्णनाचे मोटार वाहन चालविण्याचे लायसन किवा कोणतेही चालन लायसन मिळविलेले आहे; किंवा
(f)च) फ) त्या व्यक्तीने, या अधिनियमाच्या उदिष्टे लक्षात घेता, केन्द्र शासनाकडून विहित करण्यात येईल अशी, ज्यामुळे लोकांना उपद्रवकारक किंवा धोकादायक ठरण्याचा संभव आहे, अशी कृती केलेली आहे; किंवा
(g)छ) ग) ती व्यक्ती, कलम २२ चे पोटकलम (३) च्या परंतुकामध्ये निर्देशिलेल्या चाचण्यांस उपस्थित राहिली नाही किंवा तीमध्ये उत्तीर्ण झालेली नाही; किंवा
(h)ज) ह) लायसनधारकाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या लेखी संमतीने शिकाऊ व्यक्ती लायसन किंवा चालकाचे लायसन जिला देण्यात आले आहे आणि त्या व्यक्तीने अशी काळजी घेण्याचे बंद केले आहे;
अशी व्यक्ती अठरा वर्षापेक्षा कमी वयाची आहे;
तर त्याबाबतीत कारणे लेखी नमूद करुन ते प्राधिकरण ,-
एक) त्या व्यक्तीस लायसनमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या सर्व किंवा कोणत्याही वर्गाची किंवा वर्णनाची वाहने चालविण्यासाठी कोणतेही चालन लायसन धारण करण्यास किंवा मिळविण्यास विनिर्दिष्ट कालावधीपुरते अपात्र ठरविणारा;
दोन) कोणतेही असे लायसन रद्द करणारा;
आदेश काढू शकेल.
१.(१अ) कलम २०६ च्या पोटकलम (४) अन्वये लायसन देणाऱ्या प्राधिकरणाकडे लायसन पाठविले असेल व जर लायसन प्राधिकरणाचे समाधान झाले असेल तर वाहन चालविण्याचे लायसन मिळालेल्याला त्याचे म्हणणे ऐकून घेण्याची संधी दिल्यानंतर वाहन चालविण्याचे लायसन धारकाला ते परत देईल किंवा अशी व्यक्ती अपात्र असल्याबाबतची कारणे लेखी देऊन कोणतेही वाहन चालविण्यासाठी किंवा लायसनमध्ये विनिर्दिष्ट केलेली वाहने चालविण्यासाठी अपात्र ठरवेल,-
(a)क) अ) पहील्या अपराधा तीन महिने;
(b)ख) ब) दुसऱ्या किंवा लागोपाठच्या अपराधासाठी असे लायसन रद्द करणे :
परंतु या कलमाखाली वाहन चालविण्याचे लायसन रद्द केले असेल तर केन्द्र शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या पद्धतीप्रमाणे लायसनधारकाचे नाव सार्वजनिक ठिकाणी लावेल.)
२) पोटकलम (१) खाली १.(किंवा पोटकलम (१अ)) खाली असा आदेश काढला असले त्याबाबतीत चालकाचे लायसनधारक, आपले चालन लायसन, जर त्याने अगोदरच ते परत केले नसेल तर, आदेश काढणाऱ्या लायसन प्राधिकारणाकडे तात्काळ परत करेल, आणि लायसन प्राधिकरण –
(a)क) अ) जर ते चालकाचे लायसन म्हणजे या अधिनियमाखाली देण्यात आलेल चालन लायसन असेल तर, अपात्रता संपेपर्यंत किंवा ती मागे घेण्यात येईपर्यन्त ते लायसन ठेवून घेईल ; किंवा
(b)ख) ब) जर ते या अधिनियमाखाली देण्यात आलेले चालकाचे लायसन नसेल तर, त्यावर अपात्रतेसंबंधीचे पृष्ठांकन करील व ज्या लायसन प्राधिकरणाने ते लायसन दिले असेल त्याच्याकडे ते पाठवील;
(c)ग) क) कोणतेही लायसन रद्द केले असेल त्या बाबतीत, त्यावर त्यावर रद्द करण्यात आल्याबाबत पृष्ठांकित करील आणि ते प्राधिकरण जर ते लायसन देणारे प्राधिकरण नसेल तर, ते लायसन ज्या प्राधिकरणाने दिलेले आहे त्या प्राधिकरणाला ते रद्द करण्यात आल्याबाबत कळवील :
२.(परंतु असे की, लायसन धारकाला वाहन चालविण्याचे लायसन त्याच्या अपात्रतेच्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर जर त्याने ड्राइव्हर रिफ्रेशर प्रशिक्षणांचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्याला लायसन परत दिले जाईल.)
(2A)२क) ३.(२अ) ज्या लायसन धारकाचे लायसन रद्द केले असेल त्याने ड्राइव्हर रिफ्रेशर प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रम, शाळा किंवा संस्था ज्या कलम १२ अन्वये नियमित केल्या असतील व ज्यांना लायसन दिले असेल किंवा केन्द्र शासनाने अधिसूचित केलेल्या इतर एजन्सीमधून पूण करावयास पाहिजे.
(2B)२ख) २ब) ड्राइव्हर रिफ्रेशर प्रशिक्षण अभ्यासक्रम, त्याचे स्वरुप, अभ्यासक्रम, आणि कालावधी केन्द्र शासन विनिर्दिष्ट करेल त्याप्रमाणे असेल.)
३) लायसन प्राधिकरणाने पोटकलम (१) किंवा १.(किंवा पोटकलम (१अ)) खाली काढलेल्या आदेशामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस, आदेश मिळाल्यापासून तीस दिवसांच्या आत, विहित प्राधिकरणाकडे अपील करता येईल आणि असे अपील प्राधिकरण, लायसन प्राधिकरणास नोटीस देईल आणि कोणत्याही पक्षाने तसे फर्मावल्यास त्याचे म्हणणे ऐकून घेईल आणि त्याबाबतीत स्वत:ला योग्य वाटेल असा आदेश देईल आणि अशा कोणत्याही अपील प्राधिकरणाने काढलेला आदेश अंतिम असेल.
——–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम १९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम १९ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम १९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply