Mv act 1988 कलम १९९अ(क) : १.(अल्पवयीन मुलांनी केलेल अपराध :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९९अ(क) :
१.(अल्पवयीन मुलांनी केलेल अपराध :
१)जिथे एखादा अपराध या अधिनियमान्वये कोणत्याही अल्पवयीन द्वारा केला असेल तर त्याचा पालनकर्ता किंवा मोटार वाहनाचा मालक हे उपबंधाचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी धरले जातील आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल व शिक्षा दिली जाईल :
परंतु या पोटकलमान्वये असा पालनकर्ता किंवा वाहनाचा मालक या अधिनियमान्वये उपबंधित कोणत्याही शिक्षेस पात्र असणार नाही जर त्याने सिद्ध केले की हा अपराध त्याला माहित नसताना घडला आहे किंवा त्याने अपराध घडू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली होती.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, अल्पवयीन मोटार वाहनाचा वापर यथास्थिति त्याच्या पालनकत्र्याच्या किंवा मोटार वाहनाच्या मालकाच्या संमतीने केला आहे असे न्यायालय समजेल.
२) पोटकलम (१) खालील शिक्षेव्यतिरिक्त, असा पालनकर्ता किंवा मोटार वाहनाचा मालक तीन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र होईल.
३) कलम ८ अन्वये अल्पवयीनला अपराधाच्या वेळी शिकाऊ लायसन किंवा वाहन चालविण्याचे लायसन दिलेले असेल आणि तो मोटार वाहन वापरत असेल तर पोटकलम (१) आणि पोटकलम (२) चे उपबंध अशा पालनकत्र्यांना किंवा वाहनाच्या मालकाला लागू होणार नाही.
४) या कलमान्वये कोणत्याही अल्पवयीन द्वारा अपराध केला असेल तर अपराधाच्या वेळी वापरण्यात आलेल्या मोटार वाहनाची नोंदणी बारा महिन्यासाठी रद्द केली जाईल.
५) या अधिनियमान्वये अल्पवयीनने कोणताही अपराध केला असेल तर, कलम ४ किंवा कलम ७ मध्ये काहीही असले तरी, अशा अल्पवयीनला कलम ९ अन्वये चालन लायसन किंवा कलम ८ अन्वये शिकाऊ लायसन, अल्पवयीन वयाची पंचवीस वर्ष पूर्ण करीत नाही तोपर्यंत दिले जाणार नाही.
६) या अधिनियमान्वये अल्पवयीनने अपराध केला असेल तर अशा बाबतीत या अधिनियमात उपबंधित केल्याप्रमाणे दंडित होईल तरीही अभिरक्षक अभिरक्षा किंवा दंडादेश किशोर न्याय अधिनियम २००० च्या उपबंधाअन्वये बदलली जाईल.)
———
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८५ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply