मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९८अ(क) :
१.(रस्त्याचा आराखडा, बांधणी आणि व्यवस्थापनाच्या मानकांचे अनुपालन करण्यास कसूर करणे :
१) रस्त्याचा आराखडा किंवा बांधणी किंवा व्यवस्थापनाचे सुरक्षा मानकांसाठी उत्तरदायी असणारे अभिहित प्राधिकारी, ठेकदार, सल्लागार किंवा रस्ता आराखड्यासाठी सवलत देणारे बांधणी आणि व्यवस्थापनाच्या मानकांचे अनुपालन करतील, जे केन्द्र शासन वेळे वेळी विहित करील.
२) जिथे पोटकलम (१) अन्यये जबाबदार असलेले प्राधिकरण, ठेकेदार, सल्लागार किंवा आराखडा बनविण्यात जबाबदार असलले यांनी रस्त्याच्या आराखड्याचा, बांधणीचा दर्जा आणी त्याच्या व्यवस्थापनासाठी असलेल्या मानकांचे अनुपालन करण्यास कसूर करील आणि परिणामस्वरुप कोणत्याही व्यक्तीचा मृत्यु किंवा नि:शक्तता होतो तेव्हा असा प्राधिकारी किंवा ठेकेदार किंवा सल्लागार एक लाख रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र होतील आणि वसूल झालेली रक्कम ही कलम १६४ब अन्वये स्थापित झालेल्या निधी मध्ये जमा केली जाईल.
३) पोटकलम (२) च्या प्रयोजनासाठी न्यायायल विशेषकरुन निम्नलिखित बाबतीत विचार करेल, अर्थात :-
(a)क)अ) रस्त्याची वैशिष्ट्ये आणि वाहतुकीची पद्धत आणि प्रकार रस्त्याच्या आराखड्यानुसार वापर होणे अपेक्षित असेल;
(b)ख)ब) अशा वाहतकी साठी वापर आणि पद्धत यासाठी व्यवस्थापनाचा दर्जा;
(c)ग) क) रस्त्याचा वापर करणाऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे रस्त्याची दुरुस्ती;
(d)घ) ड) मान्यता असलेले प्राधिकरण रस्त्याच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार आहे किंवा नाही किंंवा रस्त्याच्या स्थितीमुळे रस्ता वापर करणारे धोक्यात पडण्याची संभावना होती;
(e)ङ)ई) मान्यता असेलेल प्राधिकरण रस्त्याच्या व्यवस्थापनाला जबाबदार आहे का की ज्यायोगे कोणतीही कृती करण्याआगोदर रस्त्याची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे;
(f)च) फ) रस्त्यावर चिन्हांच्या माध्यमातून रस्त्याची स्थिती संबंधात पर्याप्त चेतावणीच्या सुचना प्रदर्शित होतात का; आणि
(g)छ)ग) केन्द्र शासन विनिर्दिष्ट करील अशा इतर बाबी.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, ठेकेदार किंवा उपठेकेदार आणि असे सर्व व्यक्ती सम्मिलित होतील, जे कोणत्याही रस्त्याच्या आराखडा, बांधणी आणि व्यवस्थापनासाठी जबाबदार आहेत.)
———
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८४ अन्वये समाविष्ट करण्यात आले.