Mv act 1988 कलम १९७ : प्राधिकार नसताना वाहन घेऊन जाणे :

मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९७ :
प्राधिकार नसताना वाहन घेऊन जाणे :
१) जो कोणी कोणेही मोटार वाहन, त्याच्या मालकाची संमती किंवा इतर कायदेशीर प्राधिकार असल्याशिवाय ताब्यात घेईल व चालवीत घेईल व चालवीत घेऊन जाईल त्याला तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या तुरूंगवासाची किंवा १.(पाच हजार रुपये) इतक्या दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतील.
परंतु, आपणास कायदेशीर प्राधिकार आहे अशा वाजवी समजुतीने किंवा मालकाची संमती मागण्यात आली असती, तर त्या प्रकरणाच्या परिस्थितीत त्याने ती दिली असती, तर त्या प्रकरणाच्या परिस्थितीत त्याने ती दिली असती अशा वाजवी समजुतीने तो आरोपी वागला होता अशी न्यायालयाची खात्री झाल्यास आरोपी व्यक्तीला या कलमाखाली दोषी ठरवण्यात येणार नाही.
२) जो कोणी बेकायदेशीरपणे जबरदस्ती करून किंवा जबरदस्ती करण्याची धमकी देऊन किंवा इतर कोणत्याही प्रकारे धाकदपटशा दाखवून मोटार वाहन ताब्यात घेईल किंवा त्यावर नियंत्रण ठेवील त्याला तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या तुरूंगवासाची किंवा २.(पाच हजार रुपये) इतक्या दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतील.
३) जो कोणी कोणत्याही मोटार वाहनाच्या बाबतीत, पोट-कलम (१) किंवा पोट-कलम (२) मध्ये उल्लेख केलेल्या कृतींपैकी कोणतीही कृती करील किंवा अशी कोणतीही कृती करण्यास चिथावणी देईल त्याने प्रकरणपरत्वे पोट-कलम (१) खालील किंवा पोट-कलम (२) खालील अपराध केलेला असल्याचे मानण्यात येईल.
——–
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८२ अन्वये पाचशे रुपयांपर्यंत याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८२ अन्वये पाचशे रुपयांपर्यंत याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply