मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९६ :
विमा न उतरवलेले वाहन चालवणे :
जो कोणी कलम १४६ च्या तरतुदींचे उल्लंघन करून एखादे मोटार वाहन चालवील किंवा मोटार वाहन चालवायला लावील किंवा चालवू देईल त्याला १.(पहिल्या अपराधाबद्दल) तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतींच्या तुरूंगवासाची किंवा २.(दोन हजार रुपये)इतक्या दंडाची किंवा या दोन्ही शिक्षा ३.(आणि त्यानंतरच्या अपराधासाठी तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची किंवा चार हजार रुपये इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा) होऊ शकेल.
———
१. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
२. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८१ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. २०१९ चा अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम ८१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.