मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९४ब :
१.(सुरक्षा बेल्टचा वापर आणि बालकांचे आसन व्यवस्था :
१) जो कोणी, मोटार वाहन चालविताना सीट बेल्ट वापर नसेल किवा अशा प्रवाशांना घेऊन जातो ज्यांनी सीट बेल्ट वापरला नाही त्याला एक हजार रुपये इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल :
परंतु, राज्य शासन, अशा परिवहन वाहनांना, जी उभे राहून प्रवासी वाहून नेतात किंवा परिवहन वाहनांचे अन्य विनिर्दिष्ट वर्गे जे राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अधिसूचित करील, ती वाहने या पोटकलमाच्या अधीनेतेतून वगळू शकेल.
२) जो कोणी, कोणतेही मोटार वाहन चालवित असेल किंवा कोणामार्फत चावलवित असेल qकवा चालविण्यास संमती देईल अशा वाहनात चौदा वर्ष पूर्ण केली नाहीत असा बालक प्रवास करीत असेल व त्याने सुरक्षा बेल्ट किंवा बाल अवरोध प्रणाली द्वारा सुरक्षित केले नसेल, तर तो एक हजार रुपये इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र होईल.)
————-
१. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम ७९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.