मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १९४फ(च) :
१.(शांतता क्षेत्रात हॉर्न वाजविणे :
जो कोणी,-
(a)क) अ) मोटार वाहन चालविताना –
एक) सुरक्षा सुरक्षित करण्याकरिता अनावश्यक स्वरुपात किंवा निरंतर सुरक्षा सुनिश्चि करण्यासाठी आवश्यकते पेक्षा अधिक हॉर्न वाजविणे, किंवा
दोन) हॉन वाजविण्यास प्रतिषेध करणाऱ्या चिन्ह असणाऱ्या क्षेत्रात हॉर्न वाजविणे, किंवा
(b)ख) ब) मोटार वाहन चालविताना सायलेन्सर व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून कटआऊट चा वापर करुन धूर सोडत असेल,
एक हजार रुपये इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस आणि दुसऱ्या किंवा त्यांनतर च्या अपराधाकरिता दोन हजार रुपये इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र होईल.)
————-
१. २०१९ चा अधिनियम क्रमाकं ३२ याच्या कलम ७९ अन्वये समाविष्ट करण्यात आले.